Free karate training for girls for self defense from Brs Rajura assembly
चंद्रपूर :- भारत राष्ट्र समिती BRS राजुरा विधानसभा क्षेत्रा तर्फे एक हात मदतीचा हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.
या उपक्रमा अंतर्गत समाजातील सर्व घटकांना आवश्यक ती मदत, सहकार्य पुरविण्याचे कार्य केले जातात.
याच अभिनव उपक्रमाच्या अनुषंगाने प्रशिक्षक सेऩसाई ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॉन कुंदन पेंदोर सर आहेत.
या उपक्रमात महाविद्यालयं व शाळेतील मुलींना स्व-संरक्षण (self defense) एक दिवसीय प्रशिक्षण निशुल्क दरात देण्यात येत आहे.

या उपक्रमाचे प्रामुख्याने उद्दिष्ट मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करीत स्वरक्षण करणे त्याचबरोबर कराटे बद्दल जनजागृती करणे आहे.
दिनांक 6 फेब्रुवारी 2024 पासून या उपक्रमाची गोंडपिपरी येथून सुरुवात करण्यात आली असून येत्या काळात संपूर्ण राजुरा विधानसभेत हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे भारत राष्ट्र समितीचे भूषण फुसे यांनी माहिती दिली.