Inauguration of Free CT Scan Examination Center by MLA Subhash Dhote
चंद्रपूर :- राजुरा विधानसभा क्षेत्रातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी या आदिवासी बहुल, दुर्गम भागातील गोरगरीब जनतेला सी. टी. स्कॅन CT Scan Machine साठी खाजगी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात पैसे मोजावे लागत होते त्यामुळे अनेक आर्थिक अडचणींमुळे सी. टी स्कॅन करू शकत नव्हते व आजाराचे निदान होऊ शकत नव्हते ही गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे MLA Subhash Dhote यांनी राज्याच्या आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे २ कोटी ५० लक्ष रुपये निधीच्या मोफत सी. टी. स्कॅन तपासणी केंद्राची मंजुरी मिळवून घेतली. या मोफत सी. टी. स्कॅन तपासणी केंद्राचे लोकार्पण आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. Inauguration of Free CT Scan Examination Center by MLA Subhash Dhote
यावेळी मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, २०१३ मध्ये उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे ९८ आर जागेचा सातबारा मंजूर करून येथे १०० खटाचे श्रेणी वर्धित रुग्णालय मंजुर केले आणि १३ मार्च २०२३ ला लोकार्पण केले. नवीन इमारत बांधकामासाठी ७ कोटी रु. निधी उपलब्ध करून दिला. १ कोटी ३५ लक्ष रुपये निधीचे नवीन शवविच्छेदनगृह उभारले. नव्याने ७० पदे मंजूर करून त्यातील २० पदे नियमित तर ५० पदे कंत्राटी पद्धतीने भरलेली आहेत. कोरोना काळात १ कोटी रु निधीच्या ऑक्सिजन प्लांटची मंजुरी मिळविली. प्रशस्त माडुलर ऑपरेशन थेटर, अद्यावत एक्स रे सुविधा, सोनोग्राफी सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच गंभीर रूग्णांसाठी ५ बेडची डायलिसिस सुविधा महिन्याभरात कार्यान्वित होणार आहे. आणि आता २ कोटी ५० लक्ष रुपये निधीचे मोफत सिटीस्कॅन तपासणी केंद्र या अंतर्गत ओपीडी आणि आयपीडी रुग्णांची मोफत तपासणी होणार आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे सर्व प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्याचे माझे ध्येय असून यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत राहणार असल्याची ग्वाही आमदार सुभाष घोटे यांनी दिली. An assurance of continuous pursuit for state-of-the-art facilities
यावेळी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, डॉ. परिमल सावंत, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक जाधव, डॉ. कपिल देशमुख, डॉ. निर्मल संचेती, डॉ. किशोर गीते, डॉ. प्रणय पंत, अशोकराव देशपांडे, दिनकर कर्नेवार, सभापती विकास देवाळकर, अफसर शेख, रुग्णालय समीती सदस्य अशोक राव, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष संदीप जैन, माजी नगरसेवक आनंद दासरी, विलास तुमाने, डॉ. उमाकांत धोटे, पंढरी चन्ने, कोमल फुसाटे, धनराज चिंचोलकर, वामन वाटेकर, भाष्कर चौधरी, पूनम गिरसावळे, सय्यद साबिर, प्रणय लांडे, सी. टी. स्कॅन टेक्निशियन खुशबू भोयर, चेतन नागोसे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. परिमल सावंत यांनी केले. संचालन पॅथॉलॉजी टेक्निशियन निवलकर यांनी तर आभार प्रदर्शन वैद्यकीय अधिक्षक डॉ. अशोक जाधव यांनी केले. कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.