Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
Homeराजकीयमाजी पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात ; आधुनिक भारताच्या नवनिर्माणात पंडित...

माजी पंतप्रधान स्व. जवाहरलाल नेहरू जयंती उत्साहात ; आधुनिक भारताच्या नवनिर्माणात पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनमोल योगदान – आमदार सुभाष धोटे

Former Prime Minister  Jawaharlal Nehru Jayanti in excitement;  Pandit Jawaharlal Nehru’s invaluable contribution to the innovation of modern India – MLA Subhash Dhote.                                                                       ◆ आ. सुभाष धोटेंच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार.

चंद्रपूर :- तालुका काँग्रेस कमीटी राजुरा च्या वतीने स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. तसेच आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते राजुरा तालुक्यातील आर्वीचे सरपंच सुरज माथनकर, चार्लीचे सरपंच विजय निवलकर, उपसरपंच सचिन धांडे, ग्रामपंचायत सदस्य आर्वीचे अंकुश मस्की, दिलीप डाखरे, प्रफुल उपरे, मारोती आसमपल्लीवार, गीरजाबाई शिवनकर, शालू येल्लुरे, प्रियंका थेरे, विद्या माथनकर, रामपूरचे शरद शेंडे, मायाताई करलुके, सास्ती चे मधुकर झाडे या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. Pandit Jawaharlal Nehru’s invaluable contribution to the innovation of modern India – MLA Subhash Dhote. 

यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आ. सुभाष धोटे म्हणाले की, आधुनिक भारताच्या नवनिर्माणात स्व. पंडित जवाहरलाल नेहरूंचे अनमोल योगदान आहे. स्वातंत्र्यानंतर देशासमोर अनेक आव्हाने उभी होती त्यावर मात करून मोठ्या हिमतीने आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर त्यांनी हा देश मजबूत केला. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे आणि काँग्रेसचे योगदान राहिले आहे. त्यामुळे त्याच क्रांतीकारी इतिहासाला स्मरून गावागावात आणि शहराशहरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून जनसेवेला वाहून घ्यावे, केंद्र आणि राज्यातील हुकुमशाही सरकारचा खोटारडेपणा उघड करावा, काँग्रेसची विकासकामे जनतेच्या लक्षात आनुन द्यावीत असे आवाहन केले. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, जेष्ठ काँग्रेस नेते माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवर, अॅड. सदानंद लांडे, अशोकराव देशपांडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निर्मला कुळमेथे, कृ. उ. बा. स. सभापती विकास देवाळकर, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, उमाकांत धांडे, नंदकिशोर वाढई, माजी सभापती कुंदा जेणेकर, अभिजीत धोटे, माजी नगरसेवक प्रभाकर येरने यासह राजुरा तालुक्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक, जि. प. सदस्य, प. स. सदस्य, कृ. उ. बा. स. संचालक, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, काँग्रेसच्या विविध आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन कार्याध्यक्ष ऐजाज अहमद, वि. यु. काँ. चे अध्यक्ष उमेश गोनेलवार यांनी केले तर आभार प्रदर्शन रा. वि. काँ. चे प्रसिद्धी प्रमुख प्रा. प्रफुल्ल शेंडे यांनी केले. #𝗖𝗵𝗮𝗻𝗱𝗿𝗮𝗽𝘂𝗿𝗧𝗼𝗱𝗮𝘆
#चंद्रपूर टुडे न्यूज

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular