Former MP Cup men’s kabaddi matches grandly inaugurated by Hansraj Ahir
● सतशील व सन्मित्र क्रीडा मंडळाचे नामांकीत क्रीडापटू घडविण्यात मोलाचे योगदान – हंसराज अहीर
चंद्रपूर :- स्थानिक सतशिल बहूउद्देशीय व्यायाम प्रसारक मंडळ तथा संन्मित्र क्रीडा मंडळ चंद्रपूरद्वारा चंद्रपूर, वणी, आर्णी लोकसभा क्षेत्रातील कबड्डी पटूंसाठी आयोजित ‘माजी खासदार चषक’ पुरूषांचे भव्य खुल्या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या शुभहस्ते पार पडले.
विठ्ठल मंदिर वार्डातील टागोर शाळेच्या पटांगणात दि. 16 ते 18 फेब्रुवारी पर्यंत आयोजित या पुरूषांच्या कबड्डी सामन्यांच्या उद्घाटन समारंभास भाजपा नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, रमेश भूते, विनोद शेरकी, माजी नगरसेवकद्वय श्याम कनकम, राजेंद्र अडपेवार, राजेंद्र खांडेकर, सचिन साधनकर, प्रशांत करजभाजने, राकेश चहारे, विपुल चहारे व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

आपल्या उद्घाटनपर भाषणात हंसराज अहीर यांनी दोन्ही मंडळांच्या क्रीडाविषयक योगदानाबद्दल गौरवोद्गार काढत सतशील व सन्मित्र मंडळाद्वारे सर्वच क्रीडा प्रकारातील युवा खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून त्यांना जिल्हास्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत कामगीरी पार पाडण्यास संधी दिली. कबड्डी खेळास नेहमीच प्रोत्साहन राहिले आहे. विदर्भस्तरीय व अन्य खेळांचे सामने आयोजित करुन खेळाडूंना त्या-त्या खेळात प्रदर्शन करण्यास वाव दिला आहे. पठाणपूरा, विठ्ठल मंदीर वार्ड, जोडदेऊळ, हिवरपूरी हे वार्ड प्रतिभावान खेळाडूंची खाण आहे. येथील रसीक खेळाडू प्रिय आहेत. त्यामुळे या परिसराचे विशेष आकर्षण असल्याचे अहीर म्हणाले. या मंडळाद्वारा अनेक क्रीडा प्रकारातील खेळाडूंना नावलौकीक मिळवून देण्यास या मंडळांचे अभुतपूर्व योगदान असल्याचेही त्यांनी सांगीतलेे.
या कबड्डी स्पर्धेत सहभागी सर्व मंडळांच्या खेळाडूंचे स्वागत करून हंसराज अहीर यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मंडळाच्या वतिने हंसराज अहीर यांचे व मान्यवर अतिथींचे स्वागत करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्यास मंडळाचे पदाधिकारी सर्वश्री.रवींद्र शेरकी, अमित लडके, महेंद्र व्याहाडकर, प्रमोद डाखोरे, किशोर कुडे, नितीन कुमरवार, मनोज शेरकी, गणेश काळे, समीर चापले, सचिन चापले, राम लांडगे, महेंद्र शेरकी, दीपक लडके, संकेत वांढरे, घनशाम डंभारे, मोहन चैधरी, मेघनाथ चैधरी, अभिजित चैधरी, शाम चापले, रोहीत लडके, मंगेश वाघाडे, ओम लडके, सौरभ शेरकी यांची उपस्थिती लाभली होती. या समारंभास बहूसंख्येने महिला, पूरूष युवक व क्रीडा क्षेत्रातील खेळाडू उपस्थित होते.