Friday, January 17, 2025
HomeAccidentअखेर 'त्या' वाघीणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

अखेर ‘त्या’ वाघीणीला जेरबंद करण्यात वनविभागाला यश

Forest department succeeded in imprisoning the tigress

चंद्रपूर :- चंद्रपूर वनविभागा अतंर्गत चिचपल्ली परिक्षेत्रात मानव – वन्यजीव संघर्षाच्या घटना Human Wildlife Conflicts गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर घडल्या, यात चार ते पाच गुराख्यांचा बळी घेणाऱ्या टी – 83 वाघिणीला शनिवार 28 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. Tigress in Cage

चिचपल्ली परिक्षेत्रातील जानाळा, कांतापेठ, चिरोली, कवडपेठ, चिचाळा, ताडाळा परिसरात वाघिणीने हल्ला करून गुराख्यांचे प्राण घेतले ही बाब लक्षात घेता मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त डॉ. जितेंद्र रामगावकर यांचे सूचनेनुसार आनंद रेड्डी उपसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर चंद्रपूर Tadoba Tiger Project व प्रशांत खाडे विभागीय वन अधीकारी, चंद्रपूर तसेच व्ही. एस. तरसे, सहाय्यक वनसरंक्षक (तेंदु) चंद्रपूर, वाटोरे सहाय्यक वनसंरक्षक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफर चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली चिचपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक 717 मध्ये वाघिणीला प्रियंका वेलमे वनपरिक्षेत्र अधिकारी चिचपल्ली (प्रादे) तसेच राहुल कारेकर वनपरिक्षेत्र अधिकारी, बफर मुल आणि डॉ. रविकांत खोब्रागडे पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर, राकेश आहुजा बायोलॉजिस्ट ब्रम्हपुरी यांच्या नेतृत्वात अजय मराठे, शार्प शुटर यांनी यशस्वीरित्या बेशुध्द करुन वाघिणीला जेरबंद करण्यांत आले.

टी – 83 T-83 या वाघिणीला वनविभागाने जेरबंद केल्यामुळे चिचपल्ली वनपरीक्षेत्रातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular