Monday, March 17, 2025
HomeEducational'हम’ संस्थेद्वारे अक्षयतृतीयेदिनी ‘आश्रय छात्रावास’ येथे विद्यार्थ्यांना भोजनदान

‘हम’ संस्थेद्वारे अक्षयतृतीयेदिनी ‘आश्रय छात्रावास’ येथे विद्यार्थ्यांना भोजनदान

Food distribution to students at ‘Ashray Chhatrawas’ on Akshaya Tritiya by ‘Hum’ organization

चंद्रपूर:- हम (ह्युमन युनायटेड मिशन मल्टीपर्पज सोसायटी) Hum Multipurpose Mission Society बहुउद्देशिय संस्था, चंद्रपूर द्वारे दि. 11 मे 2024 रोजी श्री हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती द्वारा सेवा प्रकल्प ‘‘आश्रय छात्रावास’’ चंद्रपूर येथे वास्तव्यास असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना अक्षयतृतीयेचे औचित्य साधुन भोजनदान कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास ऍड. अभय पाचपोर, सेवा प्रकल्प विश्वस्त मंडळाचे सचिव ऍड. आशीष धर्मपुरीवार, हम संस्थेच्या अध्यक्षा ऍड. चैताली बोरकुटे-कटलावार, सचिव राहुल बनकर, गंगाधर कुंटावार यांची प्रमुख उपस्थिती होती. Social Activity

हम संस्थेद्वारे आर्थिक, दुर्बल, वंचित घटकांकरीता वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या या संस्थेने चॅरीटी कार्यक्रमाचे आयोजन करुन विविध क्षेत्रात कार्य करीत असलेल्या संस्थांना आर्थिक मदतीचाही हात दिला आहे.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षांनी संस्थेमार्फत शहरातील विविध भागांतील मुला/मुलींसाठी संस्कार शिबीरांचे आयोजन करणार असल्याचे सांगीतले व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी ‘‘हम’’ संस्था नेहमीच तत्पर असल्याचेही त्या म्हणाल्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यास ऍड अभय पाचपोर, ऍड आषिश धर्मपुरीवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी, छात्रावास येथे सेवा देणारे कर्मचारी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular