Sunday, April 21, 2024
HomeCrimeजिल्ह्यातील कायदा व सुवस्था सुधारण्यावर भर द्या - आमदार प्रतिभा धानोरकर

जिल्ह्यातील कायदा व सुवस्था सुधारण्यावर भर द्या – आमदार प्रतिभा धानोरकर

Focus on improving law and order in the district – MLA Pratibha Dhanorkar

चंद्रपूर :- जिल्हा तसा शांत जिल्हा म्हणून महारष्ट्रात ओळखला जातो. परंतू अलिकडे सतत होत असलेल्या हत्यांमुळे नविन ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा करण्याचे मत आमदार प्रतिभा धानोरकर Mla Pratibha Dhanorkar यांनी गृह मंत्री तथा उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस Deputy CM Devendra Fadanvis यांना लिहिलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे.

मागील दोन महिन्यांच्या काळात विविध कारणातून जवळपास 15 जणांच्या हत्या झाल्या आहेत. यापैकी काही गुन्हे हे कौटुंबिक वादातून तर इतर गुन्हे वेगवेगळ्या कारणातून झाले आहे. कौटुंबिक वादातून घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी पोलिस स्टेशन मधे समुपदेशन कक्ष उभारल्यास होणाऱ्या घटना टाळता येईल, असे मत आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले.

त्या सोबतच कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्याकरीता अवैध धंद्यावर आळा बसविणे गरजेचे आहे. कारण यातूनही अनेक गुन्हे घडतांना दिसुन येत आहे. युवकांना देखील गुन्ह्यापासून दुर करण्याकरीता योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत आमदार धानोरकर यांनी व्यक्त केले आहे.

महाविद्यालयीन स्तरावर पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून युवकांना योग्य असे मार्गदर्शन झाल्यास भविष्यात गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालता येईल यासाठी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याना भेटणार असल्याचे देखील सांगितले. यावेळी महीला सुरक्षतेच्या संदर्भाने देखील चर्चा करणार असल्याचे सांगितले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular