Prohibited flavored tobacco seized by Chandrapur local crime branch
चंद्रपुर :- जिल्हयामध्ये अवैध धंदयावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर Lcb Chandrapur यांना दिले
त्याअनुषगाने पो. नि. महेश कोंडावार, स्थागुशा, चंद्रपुर यांनी पथके नेमुन त्यांना अवैध धंदयावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. Crime
दिनांक 30 एप्रिल रोजी गोपनिय बातमिदाराकडुन मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी हनुमान श्रीकृष्ण आंबटकर, वय-36 वर्ष, धंदा- किराणा दुकान, रा. मराठा चौक, बाबुपेठ वार्ड, चंद्रपुर, ता. जि. चंदपुर याचे घराची सुगंधीत तंबाखू बाबत घर झडती घेवुन त्याचे घरून ईगल हुक्का सुगंधीत तंबाखू, होला हुक्का सुगंधीत तंबाकु तसेच मजा 108 सुगंधीत तंबाकु असा एकुण 3,89,870/- रूपयाचा माल जप्त करून नमुद आरोपी हनुमान श्रीकृष्ण आंबटकर यास जप्त सुगंधीत तंबाखू बाबत विचारणा केली असता त्यांनी अमरदिप गुप्ता रा. रयतवारी कॉलरी, चंद्रपुर याचेकडुन आणल्याचे सांगितले. Seized Prohibited Flavoured scented Tobbaco
त्यावरून दोन्ही आरोपीतांविरुध्द पोलीस स्टेशन रामनगर येथे अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीस पुढील तपास कामी पोलीस स्टेशन, रामनगरचे ताब्यात देण्यात आले. Police Raid
सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि हर्षल एकरे, पोउपनि विनोद भुरले, पोहवा किशोर वैरागडे, रजनिकांत पुठ्ठावार, सतिश अवथरे, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे