Financial assistance to flood victims A statement of the Republican Party to the Chief Minister
चंद्रपूर :- महाराष्ट्रातील सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात मागील महिन्या पासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती, अनेक जिल्ह्यात सातत्याने झालेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला,एवढेच नव्हे तर कित्येक गावात तलाव, ढग फुटून अनेकांच्या घरात पाणी शिरले आणि सर्व घरघुती जीवनावश्यक वस्तूंची नासधुस झाली.
ग्रामीण भागातील शेतातील पिके वाहून गेली, पशुधनाची असंख्य हाणी झाली, घरांची पडझड झाली असे भयावह परिस्थिती उपस्थित झाली असून माणुसकीच्या नात्याने अनेक सामाजिक, राजकीय संघटन आणि धर्मादाय संस्था बाधितांना मदत करत आहेत. तरी पण संसार उद्ध्वस्त झालेल्या या कुटुंबांना भक्कम आधार देऊन उभे करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र शासन आणि सरकारद्वारे आर्थिक साहाय्य करणे गरजेचे असल्याने अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्फतीने सर्व कैफियत मांडली आणि आधार देण्याची विनंती केली.
पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांच्या मार्गद्शनाखाली राष्ट्रीय कोषाध्यक्ष प्रतीक डोर्लीकर, जिल्हाध्यक्ष प्रेमदास बोरकर, शहर सचिव कैलाश शेंडे आणि सुनील जुंनघरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.