Sunday, April 21, 2024
Homeअपघातअखेर... तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेला प्रज्वल नहारामध्ये आढळला..

अखेर… तीन दिवसापूर्वी बेपत्ता झालेला प्रज्वल नहारामध्ये आढळला..

Finally… the body of Prajwal, who went missing three days ago, was found in the canal        सावली :- सावली शहरातील प्रज्वल रोशन डोहणे हा आपल्या मेहुणा राहुल उंदिरवाडे याच्या सोबत मिळून शेतावरती खत टाकण्यासाठी गेले असता शेतालगत खताच्या बॅगा उतरवुन त्याला बोलले तु इथेच रहा मी खत टाकण्याकरीता केशरवाही येथुन खत टाकणाऱ्या मजूर यांना घेऊन येतो. मजूर मिळाल्यानंतर मजुरांना घेऊन परत शेताकडे आल्यानंतर राहुल हा खताजवळ येऊन पाहिले असता प्रज्वल तिथे दिसला नाही,  राहुलला वाटले प्रज्वल हा घरी गेलेला असावा म्हणून खत टाकून झाल्यानंतर राहुल प्रज्वलच्या घरी गेला. तर प्रज्वल घरी न आल्याची माहीती प्रज्वल च्या घरच्यानी दिली.

राहुलने आणी त्याचा घरच्याणी शोधाशोध केली घरचे लोक पोलीस प्रशासन, तालुका आपत्कालीन बचाव पथक Rescue Team तीन दिवस सतत घोसीखुर्दच्या नहरात शोधाशोध घेत होते. Finally… the body of Prajwal, who went missing three days ago, was found in the canal

प्रज्वलचे हात खताच्या पिशवीने भरले असल्याने तो नहराच्या पाण्यात हात धुवायला गेलेला असावा आणि कदाचित त्याचा पाय घसरून पडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता किंवा तालुक्यात बिबट आणि वाघाचा धुमाकुळ असल्याने नेले असावे असा अंदाजही शंका करण्यात आले होते.

सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी तब्बल 3 दिवसानंतर सायंकाळच्या जवळपास 5 वाजताच्या सुमारास गोसीखुर्द नहरात Gosikhurd Canal प्रज्वल चा मृतदेह आढळला.

घरातील एकुलता एक मुलगा मृत्त पावल्याने घरात शोककळा पसरली व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular