Saturday, April 20, 2024
HomeLoksabha Electionअखेर.... प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर काँग्रेसचे शिक्कामोर्तब

अखेर…. प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर काँग्रेसचे शिक्कामोर्तब

Finally…Congress stamp on Chandrapur Lok Sabha Pratibha Dhanorkar’s name

चंद्रपूर :- लोकसभा निवडणूक 2024 Loksabha Election 2024 करीत चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रकरीता महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत कमालीची उत्सुकता असतांना आज ती उत्सुकता काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर Pratibha Dhanorkar यांना उमेदवारी जाहीर होऊन संपुष्टात आली.

चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेकरिता काँग्रेसच्या उमेदवारी बाबत रस्सीखेच सुरू होती, वरोरा विधानसभेच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी आपली दावेदारी केल्यानंतर विजय वडेट्टीवार यांच्या सुकन्या शिवानी वडेट्टीवार यांनी आपली दावेदारी पक्षश्रेष्ठी पुढे ठेवली. यामुळे चंद्रपूरच्या उमेदवारी मोठा संभ्रम निर्माण झाला, यानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मुलगी शिवानी यांना उमेदवारी न देता विजय वडेट्टीवार यांनी स्वतः निवडणूक लढवावी असा पर्याय ठेवला होता.
त्यानंतर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे, वणी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार वामनराव कासावर यांचाही पर्याय उभा ठाकला होता आज अखेर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेसला एकमेव चंद्रपूर लोकसभा जागेवर बाळू धानोरकर यांच्या रूपाने विजय मिळवता आला परंतु बाळू धानोरकर यांचे अकाली निधनाने चंद्रपूर लोकसभा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक होईल असे भाकीत होते दरम्यान 2024 ची लोकसभा निवडणूक जाहीर झाली.

बाळू धानोरकरांच्या अकाली निधनाने प्रतिभा धानोरकर यांना मोठया प्रमाणावर लोकसभा क्षेत्रातील मतदारांची सहानभूती लाभेल असे मानले जात आहे, तसेच प्रतिभा धानोरकर यांनी वणी आर्णी विधानसभा क्षेत्र पिंजून काढला यामुळे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्यात रंगत होईल अशी सामान्य नागरिकांत चर्चा आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular