Monday, March 17, 2025
HomeEducationalसैनिक आणि मिलिटरी स्कूलमध्ये निवड होणे हे तुमच्या कठोर परिश्रम आणि निष्ठेचे...

सैनिक आणि मिलिटरी स्कूलमध्ये निवड होणे हे तुमच्या कठोर परिश्रम आणि निष्ठेचे फळ – आ. किशोर जोरगेवार

felicitation ceremony for soldiers and military school graduates on behalf of Young Chanda Brigade

चंद्रपूर :- सैनिक स्कूलमध्ये प्रवेश मिळवणे हे तुमच्या धैर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. तुमच्या मेहनतीने तुम्ही आज इथे उभे असून सैनिक स्कूल आणि मिलिटरी स्कूलमध्ये निवड होणे हे तुमच्या कठोर परिश्रम आणि निष्ठेचे फळ असल्याचे प्रतिपादन MLA Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

यंग चांदा ब्रिगेडच्या Young Chanda Brigade शिक्षण विभाग आघाडीच्या वतीने कार्यालयात राष्ट्रीय मिलिटरी स्कूल National Military School आणि सैनिक स्कूलमध्ये निवड झालेल्या चंद्रपूरातील विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सेवानिवृत्त सैनिक रोषण अलोने, सेवानिवृत्त सैनिक अश्विन दुर्गे, ज्ञानोबा नरोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. Getting selected in Sainik and Military School is the fruit of your hard work and dedication – MLA Kishore Jorgewar

यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, सैनिक स्कूलमधील शिक्षण तुमच्यासाठी जीवनातील एक नवा अध्याय असून यात तुम्ही अनुशासन, नेतृत्वगुण आणि सेवा भावनेत परिपूर्ण होणार आहात. शिक्षकांच्या कष्ट आणि समर्पणामुळेच हे विद्यार्थी आज इथे उभे आहेत. तुमच्या मार्गदर्शनामुळेच त्यांना योग्य दिशा मिळाली आणि त्यांच्या क्षमतेचा पूर्ण वापर करता आला. तुमच्या अथक प्रयत्नांमुळेच आज हे विद्यार्थी सैनिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सक्षम झाले आहेत. पालकांच्या सततच्या पाठिंब्यामुळे आणि त्यागामुळे मुलांनी हे यश मिळवले आहे. हे यश तुमच्यासाठी फक्त एक प्रारंभ आहे. सैनिक स्कूलमध्ये तुम्हाला उत्कृष्ट शिक्षण, शारीरिक प्रशिक्षण आणि मानसिक बळ मिळणार आहे. या संधीचा पूर्ण वापर करून, तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने देशाची सेवा करण्यासाठी सज्ज व्हा. नवीन ज्ञान मिळवा, नवीन गोष्टी शिका आणि आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करा. तुमची मेहनत आणि समर्पणच तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाईल, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये निवड झालेल्या सुनिधी निर्वाण हिचा विशेष सत्कार

राजस्थान येथील राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये देशातील 10 मुलांची निवड करण्यात आली आहे. यात सुनिधी निर्वाण हिचा समावेश असून सुनिधी ही या शाळेत प्रवेश मिळवणारी राज्यातील एकमेव मुलगी आहे. तिच्या या कामगिरीबद्दल आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular