Monday, June 16, 2025
HomeEducationalमुलींना व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेशा करीता शुल्क माफी देण्यासंदर्भात विद्यापीठाने परिपत्रक काढावे

मुलींना व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेशा करीता शुल्क माफी देण्यासंदर्भात विद्यापीठाने परिपत्रक काढावे

The University should issue a circular regarding fee waiver for girls for admission to vocational courses
Gondavas demand university young teachers

चंद्रपूर :- राज्य सरकारने अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, व्यवस्थापन अशा विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात 100 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या संलग्नित महाविद्यालयातील विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांना केंद्रीय प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या मुलींना 100 टक्के शुल्क माफी देण्यासंदर्भात तात्काळ परिपत्रक काढावे अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशन ने केली आहे.

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या आत तसेच प्रवेश केंद्रीय प्रवेश प्रक्रिये द्वारे झालेला असणे ही मुख्य अट आहे.विविध महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाद्वारे तसे निर्देश नसल्याने विविध व्यवसायिक अभ्यासक्रम तील प्रवेशा करिता मुलींना अडचणी निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर गोंडवांना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांना निवेदन दिलेले आहे. Gondavas demand university young teachers

यावेळी यंग टीचर्स संघटनेचे अध्यक्ष डॉ.संजय गोरे डॉ. संदीप मांडवगडे, डॉ.केवल कराडे, डॉ.प्रफुल्ल वैराळे, डॉ. शरद बेलोरकर, प्रा. प्रवीण उपरे इत्यादी संघटनेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून या संदर्भात त्वरित परिपत्रक काढण्याचे आश्वासन प्र -कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे यांनी शिष्टमंडळाला दिले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular