Farmers hit the forest department office in heavy rain
A march against the forest department led by Bhushan Phuse
चंद्रपूर :- मानव वन्यजीव संघर्षाचे Human Wildlife conflict प्रकरण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, वन्यजीवांच्या हैदोसाने जिल्हातील शेत पिकांचे मोठे नुकसान होत असते, सोबतच कित्येक शेतकऱ्यांना यात आपला जीव गमवावा लागला आहे आणी वन्यजीवांचे मानवांवर हल्ल्याचे प्रकार वाढतच आहेत.
वन्यजीवांना दूर ठेवण्यासाठी शेतकरी नानाविध उपाय योजना अमलात आणत असतात मात्र त्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यात सर्वाधिक नुकसान रानडुक्करामुळे होत असते. रानडुक्करांचा कायमचा बंदोबस्त करा, सोबतच इत्तर मागाण्यांना घेऊन सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील धाबा, कोठारी वन कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.>> व्हिडिओ… वनविभाग कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा
मागील आठवड्या भरापासून सतत सुरु असलेल्या संततधार पाऊस बरसत असतानाही हजारो शेतकऱ्यांनी मोर्चात सहभाग घेतला.
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास वन्यजीवांचा बंदोबस्त आम्ही आमच्या परीने करू असा इशारा फुसे यांनी यावेळी दिला.
विविध मागण्यांचे निवेदन धाबा वनपरिक्षेत्राधिकारी यांना देण्यात आले. यावेळी पोलिसांच्या मोठा बंदोबस्त होता.