Farmers got the basic mantra of intensive orchard cultivation technology in the College of Agriculture
चंद्रपूर :- महारोगी सेवा समिती संचालित आनंद निकेतन कृषी महाविद्यालय, वरोरा, येथे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, आ.नि.कृ.म, वरोरा आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद निकेतन कृषी महाविद्यालय वरोरा मध्ये राष्ट्रीय फलोउत्पादन मंडळ – एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत सघन फळबाग लागवड तंत्रज्ञान व काढणी पश्चात व्यवस्थापन या विषयावरील निःशुल्क व निवासी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन दि 11 ते 13 मार्च 2024 या दरम्यान करण्यात आले होते.
प्रशिक्षणाचे उद्घाटन दिनांक 11/03/2024 रोजी प्राचार्य डॉ. सुहास पोतदार,श्री सूचित लकडे, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, सौ..मिली पुसदेकर, सहाय्यक प्राध्यापक ( उद्यानविद्या) यांच्या उपस्थितमध्ये संपन्न झाले होते. सदर प्रशिक्षणात चंद्रपूर, नागपुर, भंडारा जिल्ह्यातील एकूण 34 प्रशिक्षणार्थीनी सहभाग घेतला. सदर प्रशिक्षणात सघन फळबाग लागवड तंत्रज्ञान संधी व आव्हाने, आंबा, संत्री, मोसंबी, पेरू या पिकातील सघन फळबाग लागवड, सघन फळबाग मधील यांत्रिकीकरण, फळबागेत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक पीक संरक्षण, प्रमुख फळपिकातील काढणी व प्रक्रिया, फळपिकांचे विक्री व निर्यात या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.यासोबतच या प्रशिक्षणात छाटणी तंत्रज्ञान, फर्टिगेशन, बहार व्यवस्थापन, फळगळ नियंत्रण उपाय याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
या प्रशिक्षणात श्री सूचित लकडे, विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या), कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली, डॉ . सुहास पोतदार, प्राचार्य, आ नि कृ म वरोरा, सौ. मिली पुसदेकर, डॉ मनोज जोगी, श्री राजेश रहाटे, श्री. नितीन गजभे, डॉ. अनिल भोगावे, सहायक प्राध्यापक, आ. नि. कृ. म, वरोरा, श्री. प्रविण वानखेडे, युनिव्हर्सल एक्सपोर्ट, नागपूर या तज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा अंतर्गत आनंदवन फळबाग प्रक्षेत्र, याठिकाणी क्षेत्रीय भेटीचे आयोजन कऱण्यात आले होते.
तीन दिवसीय प्रशिक्षण अत्यंत उत्साहात पार पडले तसेच प्रशिक्षणार्थीनी या प्रशिक्षणाबाबतीत समाधान व्यक्त केले.
प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पोतदार ,
यांनी भूषविले तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रविण वानखेडे, संचालक, युनिव्हर्सल एक्सपोर्ट, नागपूर व प्रशिक्षण कार्यक्रम संयोजिका सौ. मिली पुसदेकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे डॉ. अनिल भोगावे यांनी केले.