Give immediate benefits to farmers deprived of loan waiver and crop insurance: MNS demand
चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- चंद्रपूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा हजारो शेतकऱ्यांना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे व स्थानिक तलाठी तहसीलदार आणि वित्तीय संस्था यांच्या तांत्रिक चुकामुळे लाभ मिळाला नाही, शिवाय अस्मानी सुलतानी संकटात सापडलेल्या व उभे पीक वाया गेले असतांना बाधित किमान 50 टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याने शेतकरी हवालदिल होऊन तो आर्थिक संकटात सापडला आहे, दरम्यान सरकारने 2017 ची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना लागू करून त्या कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय केला आहे, मात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी करतांना ज्या प्रशासकीय यंत्रणा मार्फत हे काम केल्या जाते त्या यंत्रणा बरोबर काम करतं नसल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जमाफी पासून वंचित राहिले ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे पुन्हा या तांत्रिक अडचणी व चुका होऊ नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व राष्ट्रीयकृत बैंक व्यवस्थापक, सहकारी बैंक व्यवस्थापक व सहकारी संस्थाचे निबंधक यांची बैठक बोलवावी व सोबतच तालुका स्थरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षातेखाली सहकारी संस्थांचे निबंधक, राष्ट्रीयकृत बैंक व सहकारी बैंक चे व्यवस्थापक यांची बैठक लावण्याचे आदेश द्यावे व शेतकऱ्यांना लाभ द्यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला, यावेळी वरोरा भद्रावती तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
वरोरा भद्रावती तालुक्यात शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे खाते हे राष्ट्रीयकृत बैंकांमध्ये आहे व त्यांना पीक कर्ज त्या बैकामधून मिळते ते कर्ज बैंक तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महायुती सरकारने 2017 ला दीड लाखापर्यंत माफ केले होते, मात्र प्रशासकीय कर्मचारी यांच्या तांत्रिक चुकामुळे व योग्य मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने शेतकऱ्यांचे कर्ज मोठ्या प्रमाणात माफ झाले नाही. पर्यायाने शेतकऱ्यावर बैंकांकडून सक्तीची वसुली करण्यात आली व त्यासाठी शेतकऱ्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावं लागलं यांमुळं शेतकरी कर्जाच्या बोझ्याखाली दबला असून चालू हंगामात पुन्हा तो कर्जबाजारी झाला आहे, दरम्यान महायुती सरकारने सन 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी केली होती त्यापासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली, मात्र यावेळी जर त्याचं तांत्रिक अडचणी राहिल्या व त्यावर योग्य उपाय केला नाही तर शेतकरी पुन्हा कर्जमाफी पासून वंचित राहू शकते त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी स्वतः या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्यासाठी सर्व राष्ट्रीयकृत बैंक व्यवस्थापक, जिल्हा निबंधक व सहकारी व बैंकचे व्यवस्थापक यांची बैठक घेऊन तांत्रिक अडचणी दूर करून संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा व पीक विम्यापासून वंचित 50 टक्के शेतकऱ्यांना वंचित ठेवण्यात आले त्या सर्व शेतकऱ्यांना लाभ द्यावा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी निवेदनातून दिला आहे, यावेळी शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष मोहित हिवरकर, शेखर कारवटकर, गुलाब गुळघाने, जनहीत कक्ष विभाग जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, रमेश काळाबाधे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार,
पीक विम्याबाबत मनसे आग्रही.
मागील वर्षी अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणात शेत पिकांचे नुकसान झाले मात्र विमा कंपन्यानी शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे दिले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आंदोलन करावे लागले तेंव्हा कुठे विमा कंपन्याना जाग आली व 50 टक्के शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले परंतु 50 टक्के शेतकरी अजूनही पीक विमा लाभापासून वंचित आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा कंपन्याना आदेश देऊन शेतकऱ्यांना लाभ द्यावा असा आग्रह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आला आहे.