Friday, March 21, 2025
Homeकृषीपोलीस रायजिंग डे निमित्त शेतकरी जनजागृती

पोलीस रायजिंग डे निमित्त शेतकरी जनजागृती

Farmer awareness on the occasion of Police Rising Day

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा दला तर्फे संपूर्ण जिल्हा मध्ये पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात जनजागृती अभियान सुरू आहे. पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून पोलिस स्टेशन शेगाव (बू) च्या वतीने शेतकरी जनजागृती कार्यक्रम मौजा शेगांव (बु) येथील लक्ष्मी लाॅन येथे दिनांक 7 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात नायब तहसीलदार श्री. काळे यांनी महसूल विभागाशी संबंधित योजना ची माहिती दिली.

कृषी अधिकारी श्री काळे यांनी शेतकऱ्यांनी शेती कशी करावी, शेणखत कसे वापरावे, औषधाचा वापर कसा करावा यावर मार्गदर्शन केले.

वन विभाग अधिकारी श्री.सतीश शेंडे यांनी वन विभागाशी संबंधित योजना ची माहिती दिली.

पशुधन विकास अधिकारी श्री अगडते यांनी शेतकऱ्यांनी शेती करताना पशुधन वापरून आपली आर्थिक परिस्थिती बळकट करावी.

मुजावर अली यांनी सायबर क्राईम वर विस्तृत असे मार्गदर्शन केले.

चंद्रपूर पोलीस दलाचे कम्युनिटी सेलचे पोउपनी इरपाते यांनी मोबाईल चे दुष्परिणाम महिला विषयक गुन्हे यावर मार्गदर्शन केले.

यावेळी प्रगत शेतकरी श्री श्रीकांत एकुडे, श्री मोरे सर, श्री. भलमे, श्री. गरमडे यांचा सत्कार शेतकर्यांचे आसूड हे पुस्तक आणि शाल देऊन करण्यात आला.

पोलीस स्टेशन शेगाव चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या शेतातील शेत पिकाचे जंगली प्राण्यापासून संरक्षणाकरिता जे शेतकरी आपल्या शेतात विद्युत करंट वरून ताराला करंट लावून ठेवतात त्यामुळे गेल्या चार वर्षात करंटने 32 लोकांचा मृत्यू झाला असल्याबाबतची माहिती देऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकाच्या संरक्षनाकरिता शेतात विद्युत करंट न वापरता सौर ऊर्जेद्वारे करंट लावण्यात यावा असे कळविले, तसेच शेतकऱ्यांना शेतीविषयक शिक्षण घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करून आपल्या शेती उत्पन्नात वाढ करावी याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात शेगाव बुद्रुक येथील नेहरू शाळा व संत काशिनाथ कन्या शाळा येथील मुख्याध्यापकांचे सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून मौजा महालगाव येथील वांढरे यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा शांतता समिती अध्यक्ष म्हणून श्री उमेश माकोडे रा शेगाव बुद्रुक यांची निवड झाल्याने त्यांचासुद्धा सत्कार करण्यात आला.

पोलीस स्टेशन शेगाव येथील महिला पोलीस अंमलदार सरिता पेटकर यांनी ऑनलाइन ई लर्निंग प्रशिक्षण करून एका महिन्यात 21 प्रमाणपत्र प्राप्त केल्याने त्यांनी केलेल्या कार्याबाबत त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

पोलीस स्टेशन शेगाव (बु) चे ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांनी नेहरू शाळा व कन्या शाळा येथील विद्यार्थ्यांना व्हॉलीबॉल आणि नेट देऊन खेळण्याबाबत प्रोत्साहन देण्यात आले. तसेच खानगाव आणि राळेगाव येथील खेळाडूंना क्रिकेटचे साहित्य वाटप करण्यात आले. मौजा सलोरी येथे सावित्रीबाई फुले अभ्यासिका यांना स्पर्धा परीक्षा पुस्तके वाटप करण्यात आले. खानगाव येथील बुध्द विहार येथे नवीन अभ्यासिका सुरू होणार असल्याने त्यांना सुद्धा पुस्तके वाटप केली.

पोलीस स्टेशन शेगाव (बू) व शांतता समिती शेगाव (बू) यांच्यातर्फे नवरात्र उत्सव दरम्यान घेण्यात आलेल्या गरबा स्पर्धेत महालक्ष्मी ग्रुप, सार्वजनिक दुर्गा महिला मंडळ, गायत्री दुर्गा महिला मंडळ यांना क्रमशा प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक देण्यात आले.

आरोग्य विभागातर्फे हेल्थ चेक अप, ब्लड शुगर तपासणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक राळेगावचे पोलीस पाटील जितेंद्र थूल यांनी केले आभार प्रदर्शन पोउपनी सरोदे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन शेगावचे अधिकारी कर्मचारी, सर्व पोलीस पाटील आणि शांतता समिती शेगाव बू यांनी परिश्रम घेतले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular