Farewell ceremony at Kamaladevi College of Education
चंद्रपूर :- सर्वोदय महिला मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित कमलादेवी शिक्षण महाविद्यालय, बालाजी वार्ड, चंद्रपूर येथील सत्र २०२३-२४ B.Ed. बी. एड. अभ्यासक्रम द्वितीय वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. Farewell Program
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे सर यांनी भुषविले व प्रमुख उपस्थिती म्हणून प्राध्या. शमिना अली, प्राध्या. वनिता हलकरे, प्राध्यापक राजकुमार भगत, ग्रंथपाल चंदन जगताप यांनी भुषविले.

सदर कार्यकमाचे प्रास्ताविक प्राध्या, शमीना अली यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. एड. प्रथम वर्षीय विद्यार्थीनी गौतमी रायपूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन बी. एड. प्रथम वर्षीय विद्यार्थीनी रोजीना शेख यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमकांत वाकडे सर यांनी विद्यार्थ्यांना आदर्श शिक्षक होण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
तसेच प्राध्या. शमीना अली यांनी चांगल्या कार्यातून मनूष्य हा यशस्वी होतो असे सांगीतले. तसेच प्राध्या. वनिता हलकरे यांनी भावी जीवनात यशस्वी होण्यासाठी छात्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.
प्राध्यापक राजकुमार भगत सर यांनी जीवन ‘जगत असतांना अनूभव हे भविष्यासाठी उपयुक्त ठरतात असे सांगीतले.
सदर कार्यक्रमात द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांनी बी. एड. करत असतानाचे आपले अनूभव व विचार व्यक्त केले. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विजेते प्राप्त व सहभागी विद्यार्थांना महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. हेमकांत वाकडे सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमात प्राध्यापिका डॉ. जयमाला घाटे, प्राध्यापिका डॉ. प्रगती बच्चूवार, प्राध्यापिका सूचिता खोब्रागडे, प्राध्यापिका अश्विनी सातपूडके, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग श्री. मोरेश्वर गाऊत्रे, श्री. विजय बाळबुधे उपस्थित होते. सदर कार्यक्रम बी. एड. प्रथम वर्षीय विद्यार्थीनी आयोजित करून यशस्वीरित्या पार पाडला.