Saturday, April 26, 2025
HomeSocialगोंडपिपरीत पारंपारिक रांजणातून पाणपोई सुरू : शुद्ध आणि थंड पाण्याची सोय

गोंडपिपरीत पारंपारिक रांजणातून पाणपोई सुरू : शुद्ध आणि थंड पाण्याची सोय

Gondpiprit water supply from traditional Ranjan: facility of clean and cold water

भूषण फुसे यांचा पुढाकार
चंद्रजीत गव्हारे यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन

चंद्रपूर :- एकीकडे वाढता उन्हाचा पारा मात्र पिण्याचे पाणी मिळेना अशात सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्या संकल्पनेतून पारंपारिक पद्धतीने रांजणातून शुद्ध आणि थंड पाणी पिण्यासाठी गोंडपिपरी बसस्थानकाजवळ पाणपोई सुरू केली आहे.

याचा लाभ अनेक प्रवासी आणि विद्यार्थ्यांना होणार असून यातून मातीतील थंड पाणी ही भारताची परंपरा जागी झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रजीत गव्हारे यांनी पारंपारिक रांजणातील पाणी बंद झाल्याची खंत व्यक्त केली होती. सध्या मोठ्या प्रमाणात कॅन चा वापर केला जातो. यामुळे सर्व सार्वजनिक ठिकाणी रांजणातून पाणी मिळणे बंद झाले. पारंपारिक मातीच्या भांड्यात थंड पाणी पिणाऱ्या आणि उन्हाळ्यात रांजणातून पानपोई ही देखील परंपरा बंद झाली असं वक्तव्य सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यासमोर व्यक्त केले असता लगेचच भूषण फुसे यांनी रांजणातून शुद्ध आणि थंड पाण्याची सोय गोंडपीपरीकरांना करून दिली.

गोंडपिपरी बस स्थानकाजवळील पानपोईचे उद्घाटन चंद्रजित गव्हारे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी धनराज निमगडे, भगीरथ वाकडे, सोनू गेडाम, बालू फुकट तसेच अनेक कार्यकर्ते प्रवासी उपस्थित होते.

रांजणातून पाणपोई सुरू केल्याने अनेकांनी भूषण फुसे यांचे यावेळी आभार मानले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular