Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeEducationalएफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज येथे मिस एफ ई एस स्पर्धा २०२४

एफ. ई. एस. गर्ल्स कॉलेज येथे मिस एफ ई एस स्पर्धा २०२४

F.E.S.  Miss FES Pageant 2024 at Girls College

चंद्रपूर :- फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर Female Education Society द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज, चंद्रपूर F.E.S.Girls College मध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवा अंतर्गत दि. १५ फेब्रुवारी रोजी गुरुवारला ब्युटी कॉन्टेस्ट मिस एफ. ई.एस.स्पर्धेचे Beauty Contest Miss F.E.S. आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात फीमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपूर चे अध्यक्ष मा. ऍड. विजयराव मोगरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सौ. प्रेमिलाताई खत्री उपस्थित होत्या. संपूर्ण कार्यक्रम प्राचार्य डॉ. मीनाक्षी ठोंबरे यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पडला.

मिस एफ.ई.एस या स्पर्धेचे परीक्षण सौ. स्मिता खोब्रागडे मिसेस इंडिया २०२१ व शुभम गोविंदवार मिस्टर इंडिया आयकॉनिक २०२१ यांनी केले. कार्यक्रमाध्यक्ष मा. ॲड. विजयराव मोगरे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व चंद्रपूरच्या विद्यार्थिनींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मंच मिळावा म्हणून या प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे आवश्यक आहे. मागील काही वर्षांपूर्वी सुरू झालेली ही स्पर्धा सतत सुरू राहील याकरिता नेहमी प्रयत्नशील राहील असे संबोधित केले.

या स्पर्धेत एकूण ४५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या असून विद्यार्थिनींनी चार थीम मध्ये सौंदर्यकरण व रॅम्प वॉकचे सादरीकरण केले. मिस एफ ई एस २०२४ प्रतियोगिते मध्ये प्रथम क्रमांकाच्या मानकरी कु. सोफिया शेख, बीए द्वितीय वर्ष व कुमारी जागृती खैरे, बीएससी प्रथम वर्ष या विद्यार्थिनी मिस एफ.ई.एस २०२४ च्या मानकरी ठरल्या, द्वितीय विजेती कुमारी कुदसिया शेख, बीकॉम तृतीय वर्ष तसेच तृतीय विजेती कुमारी आचल ढुमणे, बीएससी तृतीय वर्ष ही ठरली.

मिस एफ.ई.एस २०२४ या कार्यक्रमाचे कोरिओग्राफी व विविध थीम प्राध्यापक डॉ. अंजली धाबेकर (ठेपाले), प्रा. आम्रपाली देवगडे, प्रा. लोकेश दर्वे, प्रा. सोनू फुले, प्रा. डॉ. पल्लवी खोके यांनी केले. तसेच कार्यक्रमाला एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपूर व हायस्कूलचे सर्व प्राध्यापक , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. आम्रपाली देवगडे व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अंजली धाबेकर यांनी केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular