Sunday, March 23, 2025
HomePoliticalवेकोलितील ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून कामगारांचे शोषण

वेकोलितील ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून कामगारांचे शोषण

Exploitation of workers by transport companies in WCL                                    MNS Workers Sena district president Aman Andhewar alleges

चंद्रपूर :- घुग्घूस – वणी एरियाअंतर्गत वेकोलितील WCL ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून चालक, वाहकांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जात आहे. अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्या स्थानिकांना डावलून परप्रांतीय कामगारांना रोजगार देत असल्याने या कंपन्यांची चौकशी करून संंबंधित कंत्राटी कंपन्याचे कंत्राट रद्द करण्याची मागणी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. Exploitation of workers

वेकोलितील कोळसा वाहतुकीचे कंत्राट अनेक लहानमोठ्या कंपन्यांना देण्यात आले आहे. बहुतांश कंपन्या या बाहेर राज्यातील आहेत. त्यामुळे या कंपन्या स्थानिकांना डावलून परप्रांतीय चालक, वाहकांना काम देत आहेत. स्थानिकांना रोजगार देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शिवाय कामगारांना वेतनपत्र दिले जात नाही. पीएफ कपात करून वेतन दिले जाते. परंतु, अद्याप कामगारांना त्यांचे पीएफ खातेक्रमांक माहिती नाही. कंपन्यांनी पीएफ खाते क्रमांकच दिले नाहीत, अशी माहिती यावेळी उपस्थित कामगारांनी दिली. MNS Workers Sena

आठ तासांची ड्युटी असताना १२ तास ड्युटी करून घेतली जाते. मात्र, अतिरिक्त कामाचे वेतन दिले जात नाही. वकोलिकडून पूर्ण वेतन उचलून कामगारांना पूर्ण वेतन दिले जात नाही. एका मजुराने जाब विचारल्यास त्याला कामावरून काढले जाते किंवा कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते. त्यामुळे कामगारांमध्ये भीती आहे.

वेकोलिने सरविजय लॉजिस्टिक प्रा.लि., हरिराम गोदरा, हाशमी प्रा. लिमिटेड, कौशलसिंग ट्रान्सपोर्ट कंपनी, चड्डा ट्रान्सपोर्ट, बीकेके ट्रान्सपोर्ट, शिवशंभू ट्रान्सपोर्ट कंपनी या कंपन्यांकडे कोळसा वाहतुकीचे कंत्राट आहे. या कंपन्यांमध्ये शेकडो चालक काम करीत आहेत. मात्र, या कंपन्यांकडून चालकांचे शोषण होत असल्याचा आरोप अमन अंधेवार यांच्यासह चालक कामगारांनी केला आहे.

पत्रकार परिषदेला नरेश वासनिक, ॲड. अजित पांडे, ॲड. महेंद्र विरोजवार, राजू शेट्टी आदींसह शेकडो चालक कामगार उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular