Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
HomeAcb Trapबियर शॉपीच्या परवान्याकरिता एक लाखाची मागणी : अधीक्षकांसह दोघे अडकले ACB च्या...

बियर शॉपीच्या परवान्याकरिता एक लाखाची मागणी : अधीक्षकांसह दोघे अडकले ACB च्या जाळ्यात

One lakh demand for license of beer shop: State excise department superintendent along with two caught in ACB’s Trap

चंद्रपूर :- जिल्ह्यासह राज्यात प्रशासकीय विभागात खळबळ माजवीणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यात घडली घडली, एका नवीन ‘बियर शॉपी’ च्या परवान्याकरिता चक्क राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर चे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक यांनी कार्यालय अधीक्षकांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांची मागणी केल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चक्क अधीक्षक व दुय्यम निरीक्षक यांचेवर कारवाई केली. ACB Trap

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथील रहिवासी यांचे घुग्घूस येथे “गोदावरी बार अॅन्ड रेस्टॉरंट” या नावाने वाईन बार आहे. यांना नवीन बिअर शॉपीचा परवाना काढायचा असल्याने त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथे परवाना मिळण्याकरीता अर्ज सादर केला होता. परंतु राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर चे अधीक्षक संजय पाटील आणि याच कार्यालयातील दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रादार यांना आज या, उदया या असे म्हणून टाळाटाळ केली व परवाना मंजुर केला नाही.

दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रारदार यांना बिअर शॉपीचा परवाना मंजुर करून देण्याचे कामाकरीता अधीक्षक संजय पाटील व स्वतः करीता 1 लाख रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदार यांची अधीक्षक आणि दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांना लाच म्हणून 1 लाख रुपये लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने अधीक्षक व दुयम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर यांचे विरुध्द लाचलूचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक 25 एप्रिल 2024, दिनांक 3 मे 2024 व आज दिनांक 7 मे 2024 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी/सापळा कार्यवाही दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर चे दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे यांनी तक्रारदार यांना 1,00,000 रुपयांची मागणी करून राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूर चे कार्यालय अधीक्षक अभय खताळ यांचे मार्फतीने स्विकारली. त्यावरून आज दिनांक 7 मे 2024 रोजी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही करण्यात आली.

सदर कार्यवाही राहुल माकणीकर, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपुर, संजय पुरंदरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, ला.प्र. वि. चंद्रपूर, तसेच कार्यालयीन स्टॉफ पो. हवा. नरेशकुमार नन्नावरे, पो. हवा. हिवराज नेवारे, ना.पो.अं. संदेश वाघमारे, पो. अ. राकेश जांभुळकर, पो.अ. प्रदिप ताडाम, म.पो.अं. पुष्पा काचोळे व चापोकॉ सतिश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/ कर्मचारी किंवा त्यांचे वतीने कोणी खाजगी इसम कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतीरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular