Ex-corporator’s husband abuses woman; Aggrieved couple demand action
चंद्रपूर :- जागेच्या कारणावरून भाजपाच्या माजी नगरसेविका जयश्री जुमडे यांचे पती महेंद्र जुमडे यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची तक्रार चंद्रकला तुम्मेवार या महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात दिली. परंतु, पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. जुमडे यांच्यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, त्याच्यावर कारवाईची मागणी चंद्रकला तुम्मेवार आणि त्यांचे पती भगवान तुम्मेवार यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
तुम्मेवार दाम्पत्याने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, तुम्मेवार यांचे रमाबाई नगर राजाभोज चौक येथे घर आहे. तुम्मेवार दाम्पत्याने घराच्या बाजूची खुली जागा आठ वर्षांपूर्वी किरण शाहू यांना विक्री केली. याच जागेलगत महेंद्र जुमडे यांचे प्लाट असून, या प्लॉटवर बांधकाम सुरू आहे. किरण शाहू यांनीसुद्धा खरेदी केलेल्या जागेवर बांधकाम सुरू केले आहे. परंतु, महेंद्र जुमडे हे ही जागा आपली असून, बांधकामात व्यत्यत आणत असल्याचा आरोप तुम्मेवार दाम्पत्यानी केला आहे. शिवाय महेंद्र जुमडे आणि नूतन मेश्राम यांनी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली आणि बधून घेण्याची धमकी दिली आहे.
रामनगर पोलीस ठाण्यात १४ नोव्हेंबर रोजी तक्रार करण्यात आली. परंतु, पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
जुमडे यांच्यामुळे जीवितास धोका असून, महेंद्र जुमडे आणि नूतन मेश्राम यांच्यावर कठोर कारवाईची मागणी तुम्मेवार दाम्पत्याने चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.