Entry into the Infant Convent is celebrated with enthusiasm
चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी राजुरा द्वारा संचालित इन्फंट जिजस इंग्लिश हायस्कूल येथे प्री प्रायमरी विभागात नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांकरिता प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संचालक अभिजीत धोटे, प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापिका मंजुषा अलोणे, मुख्याध्यापक रफिक अन्सारी उपस्थित होते.

यावेळी इन्फंट काँन्व्हेंट येथे चिमुकल्यांच्या स्वागतासाठी मोटू , पतलू , छोटा भीम, मिकी माऊस ही कार्टून सज्ज होते. तसेच पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर नृत्यांनी सर्वांचे मन मोहून घेतले.
कार्यक्रमाला पालक वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे संचालन माधुरी इरकी यांनी तर आभार प्रदर्शन वरलक्ष्मी इरगुराला यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी अथक परिश्रम घेतले.