Monday, March 17, 2025
HomeMaharashtraश्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका आमंत्रित

श्रमिक पत्रकार संघाच्या पुरस्कारांसाठी प्रवेशिका आमंत्रित

Entries invited for Labor Journalists Association Awards

चंद्रपूर :- चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे पत्रकारांसाठी प्रतिष्ठित अशा विविध स्पर्धा पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे.

यात ग्रामीण वार्ता पुरस्कार, शुभवार्ता पुरस्कार, मानवी स्वारस्य अभिरुची वृत्तकथा वृत्तछायाचित्र, दुरचित्रवाणीसाठी उत्कृष्ट वार्ताहर पुरस्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी 20 जुलै 2024 पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील. तसेच यापूर्वी पुरस्कार मिळालेल्या स्पर्धकांनाही स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे हे विशेष.

ग्रामीण वार्ता पुरस्कार स्पर्धेत चंद्रपूर जिल्हयातील ग्रामीण वार्ताहर भाग घेऊ शकतात. या स्पर्धेसाठी परिणामकारक वृत्त, वार्तापत्र, वृत्तमालीका ग्राह्य धरण्यात येतील.

स्पर्धेसाठी प्रथम, व्दितीय आणि तृतीय अशा तीन पुरस्कारांसह दोन प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. रोख पुरस्कार स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शुभवार्ता पुरस्कार केवळ चंद्रपूर शहरातील पत्रकारांसाठी असून, विधायक विषयावर झालेले लिखाण यासाठी पात्र समजण्यात येईल, तसेच मानवी स्वारस्य अभिरुची पुरस्कार देण्यात येणार असून, रोख पुरस्कारासह स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

ही स्पर्धा चंद्रपूर जिल्हयातील शहरी व ग्रामीण पत्रकारांसाठी खुली राहील. हौशी छायाचित्रकारांसाठी वृत्तछायाचित्र स्पर्धाही घेण्यात येणार असून, ज्यांचे छायाचित्र प्रादेशिक वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे, असे छायाचित्रकार यात भाग घेऊ शकतात. रोख पुरस्कारासह स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

उत्कृष्ठ वृत्तांकन (टी. व्ही.) पुरस्कार दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी दूरचित्रवाणी वृत्तवाहिनीवर चंद्रपूर जिल्हयातील प्रसारीत बातमी ग्राह्य धरण्यात येईल. स्पर्धेसाठी आपल्या बातमीचा पेनड्राईव आपल्या अर्जासह सादर कराव्यात स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिके बाबत “उत्कृष्ट वृतांकन पुरस्कार” (टेलोव्हीजन) असा ठळक उल्लेख करावा.

पुरस्कारासाठी 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले लिखाण आणि छायाचित्र ग्राह्य धरण्यात येईल. लिखाण मूळ स्वरूपात आवश्यक असून, भाषांतरीत नसावे. स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेसाठी खुली आहे.

स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे साहित्य मूळ प्रतीसह चार छायांकित प्रतित असावे. मूळ साहित्यावर नाव नसल्यास त्या कालावधीत संबंधित वर्तमानपत्राचा प्रतिनिधी असल्याचा पुरावा प्रवेशिकेसोबत जोडावा. स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका सोबत आपली, बातमी कोणत्या स्पर्धेसाठी आहे. याचा स्पष्ट उल्लेख तपशीलवार करावा. सर्व प्रवेशिका 20 जुलै 2024 पर्यंत स्पर्धा संयोजक, चंद्रपूर श्रमीक पत्रकार संघ जूना वरोरा नाका, चंद्रपूर या पत्त्यावर पाठवाव्या, असे आवाहन स्पर्धा संयोजक प्रविण बतकी (9881750655) पंकज मोहरीर, सुनील बोकडे, सुरेश वर्मा, प्रकाश देवगडे , कमलेश सातपुते, गौरव पराते यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular