Sunday, December 8, 2024
HomeSportशहरातील प्रेमाचे प्रतिक असलेल्या गोंडराजे बिरशहा-राणी हिराई वास्तुवर पुष्पअर्पण करीत इतिहासाला उजाळा...
spot_img
spot_img

शहरातील प्रेमाचे प्रतिक असलेल्या गोंडराजे बिरशहा-राणी हिराई वास्तुवर पुष्पअर्पण करीत इतिहासाला उजाळा : ‘सलाम राणी हिराई’ सारख्या कार्यक्रमातून युवकांनी आदर्श घ्यावा

Enlighten history by offering flowers at Gondaraj Birshah – Rani Hirai Fort, symbol of love: Youths should take role models from programs like ‘Salam Rani Hirai’

★ इको-प्रोसह एफईएस, सरदार पटेल, खत्री व समाजकार्य महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

चंद्रपूर :- शहरात गोंडकालिन ऐतिहासिक वास्तु असलेली गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्या समाधीवर ‘सलाम राणी हिराई’ कार्यक्रम अंतर्गत इको-प्रो संस्था, एफईएस गर्ल्स महाविद्यालय, सरदार पटेल महाविद्यालय, खत्री महाविद्यालय व मामीडवार समाजकार्य महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या विदयार्थीनीनी पुष्पअर्पण करून”सलाम राणी हिराई” कार्यक्रमातून अजरामर प्रेमाचे, कर्तृत्वाला उजाळा देत कार्यक्रमातून संदेश देण्यात आला.

आजच्या युवकांना प्रेमदिनाच्या निमीत्ताने क्षणभंगुर प्रेमाच्या मागे न लागता, प्रत्येक नात्यातील प्रेम वृध्दीगंत करण्याकरिता विशीष्ट दिवसाची गरज नसुन, पाच्छिमात्याचे अनुकरण न करता विदयाथ्र्याना योग्य संदेश देता यावा म्हणुन दरवर्षी गोंडराजे यांचे समाधीस्थळावर या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. प्रेमाचे प्रतीक असलेले राजे बिरशहा यांची समाधी राणी हिराईने त्यांच्या मृत्युनंतर या समाधी-वास्तुचे सुंदर असे बांधकाम केले होते. ताजमहलच्या नंतर त्याच तोडीची गोंडवानातील सुंदर आकर्षक अशी वास्तु बांधुन न थांबता राजेच्या मृत्युनंतर राज्यकारभार योग्य रित्या सांभाळत अनेक विकासकामे केलेली आहेत. अनेक मंदीराचा जिर्णोध्दार सुध्दा केलेला आहे, राणी हिराईचा कार्यकाळ चंद्रपूरच्या इतीहासात नोंदवीला गेलेला आहे. राणी हिराईने आपल्या कार्यातुन आपल्या पतीप्रती असलेले प्रेम अजरामर केले आहे. राणी हिराईचा हा आदर्श आजच्या युवकांनी-युवतीनी घेण्याची गरज आहे.

‘‘चंद्रपूर शहरात असलेली ही प्राचीन पुरातन वास्तु खऱ्या अर्थाने आपला ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा तसेच आपल्या कार्यातुन गोंडराजे बिरशहा व राणी हिराई यांच्यातील प्रेम अजरामर करून ताजमहलच्या तोडीची वास्तु निर्माणा सोबतच पुढील काळात योग्य राजकारभार करून या राणीने बांधुन एक आदर्श घालुन दिलेला आहे’’ असे मत विविध प्राध्यापकांनी सलाम राणी हिराई या कार्यक्रमादरम्यान डॉ करुणा करकाडे, डॉ रवी वाळके, डॉ माहुरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. ‘‘राणी हिराई आणि राजा बिरशहा यांच्यातील प्रेमचं होत की जे मृत्युनंतरही अजरामर झाले आहे, त्याच्या कार्यातुन ते सतत जिवंत राहणार आहे. आजच्या दाम्पत्यांनी तसेच युवकांनी अशा स्थळांना, स्मारंकाना भेट देत आपल्या जिवनात, हा आदर्श घेण्याची गरज असल्याचे, मत यावेळी इको-प्रो चे बंडु धोतरे यांनी व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डाॅ. राजेंद्र बारसागडे तर आभार प्रा डॉ आनंद वानखेडे यांनी मानले, उपस्थित प्राध्यापक यावेळी एफईएस महाविद्यालयचे प्रा. डॉ.मिनाक्षी जुमले, डॉ मेघमाला मेश्राम, डॉ.राजेश चिमनकर, डॉ.योगेश निमगडे, डॉ अनिल कुभंलकर, प्रा लोकेश दरवे, प्रा.पल्लवी खोके, प्रा स्वाती कनडोतीवार, सरदार पटेल महाविदयालय चे प्रा कुलदीप गौड, खत्री महाविद्यालय चे प्रा संतोष कावरे इको-प्रो चे नितीन रामटेके, धर्मेंद्र लुनावत, राजू काहिलकर, ओमजी वर्मा, भारती शिंदे, सुनील पाटील, सुनील लिपटे, सचिन धोतरे, अब्दुल जावेद यासह अन्य इको-प्रो सदस्य व शेकडो विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular