Sunday, March 23, 2025
HomeSocialWCL मध्ये स्थानिक ट्रक चालक मालकांना रोजगार द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, राजू...

WCL मध्ये स्थानिक ट्रक चालक मालकांना रोजगार द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू, राजू झोडे यांचा इशारा

Employ local truck driver owners in WCL, otherwise hit the streets, warns Raju Zode

चंद्रपूर :- चंद्रपुरातील वेकोलीच्या बल्लारपूर राजुरा धोपटाळा कोळसा खाणीत मागील अनेक वर्षांपासून स्थानिक ट्रक चालक मालक कोळसा वाहतुकीचे काम करत आहेत. मात्र आता त्यांच्या हाताला काम मिळत नसून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून स्थानिक ट्रक चालक मालकांना रोजगार द्या अन्यथा स्थानिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असा गंभीर इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे. तसे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

बल्लारपूर-राजुरा तालुक्यातील धोपटाळा कोळसा खाणीत मागील अनेक वर्षांपासून जवळपास 250 च्या वर ट्रक चालक आणी मालक काम करत आहेत. मात्र यात कोळसा वाहतुकीचे अनेक ट्रान्सपोर्टस ला काम देण्यात आले असून स्थानिकांना डाववले जात असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळं उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांना काही कामगारांनी आपबीती सांगितली असता झोडे यांनी तात्काळ दखल घेत तहसीलदार यांची भेट घेतली व लवकरात लवकर स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular