Mobilize the mechanism to get every eligible woman the benefits of Chief Minister’s Ladki Bahin Yojana – MLA Kishore Jorgewar
चंद्रपूर :- राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेची महानगरपालिका क्षेत्रात उत्तमरीत्या अंमलबजावणी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा गतिशील कार्यान्वित करत प्रत्येक पात्र महिलेला योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार MLA Kishor Jorgewar यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत. Mobilize the mechanism to get every eligible woman the benefits of Chief Minister’s Ladki Bahin Yojana
आज सोमवारी Chandrapur MNC चंद्रपूर महानगरपालिकेत आमदार किशोर जोरगेवार यांनी बैठक बोलावली होती. सदर बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली असून अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. या बैठकीला मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त रविंद्र भेलावे, सहाय्य आयुक्त सचिन माकोडे, नरेंद्र बोबाटे, अमुल भुते, अमोल शडके, अमित घुले, शहर अभियंता विजय बोरिकर, रविंद्र हजारे, डाॅ. नयना उत्तरवार, राहुल पंचबुध्दे, रविंद्र कांबळे, रफिक शेख, सारिखा शिरभाते, राहुल भोयर, आशिष भारती यांच्यासह माता महाकाली महोत्सव समितीच सचिव अजय जयस्वाल, महिला शहर प्रमुख वंदना हातगावकर, आदिवासी विभागाचे जिल्हा अध्यक्ष जितेश कुळमेथे, सविता दंडारे, सायली येरणे, अल्पसंख्याक शहर प्रमुख सलिम शेख, अल्पसंख्यांक युथ शहर प्रमुख राशेद हुसेन, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, अल्पसंख्याक महिला शहर प्रमूख कौसर खान, विमल कातकर, कल्पना शिंदे, अल्का मेश्राम, कविता निखाडे, अस्मिता दोनाडकर, शहर संघटक करणसिंग बैस, प्रसिद्धी प्रमुख नकुल वासमवार, हरमन जोसेफ, मंगेश अहिरकर, मुकेश गाडगे, राम जंगम, विनोद अनंतवार आदींची उपस्थिती होती. अनेक अधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती होती.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेबाबत महिलांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षित करा, मनपाद्वारे सुरु करण्यात आलेल्या पाच केंद्रांबाबत जनजागृती करा, केंद्रावर येणाऱ्या महिलांची गैरसोय होणार नाही, या दृष्टिकोनातून या केंद्रांवर उपाययोजना करत अर्ज स्वीकारण्याची गती वाढवा, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहेत.
अमृत 2.0 अंतर्गत प्रस्तावित कामे जलद गतीने करण्याच्या सूचनाही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. केरला कॉलनी येथील नाल्यामुळे या परिसरात पुरपरिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे सदर नाल्याची स्वच्छता करण्यात यावी, अशा सूचनाही सदर बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. अमृत योजनेचे नळाचे देयके चुकीच्या पद्धतीने देण्यात आले आहेत. याची चौकशी करून देयके वसुलीची सक्ती करू नये, अशा सूचनाही आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जन्म दाखल्यासाठी येणाऱ्या नागरिकांना कर अदा केले असल्यास दाखला दिला जाईल, असा प्रकार सुरु आहे. हे योग्य नाही. दाखल्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांना तात्काळ दाखला उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देशही आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.
पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने शहरातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्या. अनेक भागात नियमित स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. मनपाच्या शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी योजनाबद्ध दृष्टिकोनातून सर्व विभागाशी समन्वय ठेवून काम करा, असे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिले आहेत.
या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाविषयी विशेष चर्चा केली. कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा मिळण्यासाठी जलव्यवस्थापनाच्या उपाययोजना करण्याची गरज आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी व्यक्त केली. शहरातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी महानगरपालिकेने विशेष उपाययोजना कराव्यात. शहराच्या विकास प्रक्रियेत स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
महानगरपालिकेने जनतेच्या समस्या आणि सूचना विचारात घ्याव्यात, असेही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. यावेळी नागरिकांनी अनेक तक्रारी दिल्या. सदर तक्रारींची तत्काळ दखल घेण्याच्या सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. सदर बैठकीला शहरातील नागरिकांची उपस्थिती होती.