Thursday, November 30, 2023
Homeमहाराष्ट्र राज्यमहावितरणचे वीजबिल भरणा केंद्र २८ व २९ ऑक्टोबर रोजी ग्राहकांच्या सुरु

महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र २८ व २९ ऑक्टोबर रोजी ग्राहकांच्या सुरु

Electricity bill payment center of msedcl opened for customers on 28th and 29th October                                                                चंद्रपूर :- चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी चंद्रपूर परिमंडळात येणाऱ्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र २८ तथा २९ ऑक्टोबर २३ रोजी ग्राहकांच्या सोईसाठी कार्यालयीन वेळेत सुरु ठेवण्यात येणार आहे.

वीज ग्राहकांच्या सोयीसाठी महावितरण कडून Online payment ऑनलाईन वीज देयकाची भरणा करण्याची सुविधा दिली असून महावितरण ‘मोबाईल एप’ चा वापर करून वीज ग्राहक आपल्या देयकाची रक्कम भरू शकतात. Electricity bill payment center of msedcl opened for customers on 28th and 29th October

लघुदाब वर्गवारीतील सर्व वीज ग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in वेबसाईट, मोबाईल एप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे.

ऑनलाईन वीज देयक भरल्यास वेळ व श्रमाची बचत होईल आणि सोबतच ०.२५% डिजिटल पेमेंट भरणा सूट देखील मिळेल. थकबाकीदार वीज वीज ग्राहकांनी थकीत व चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे www.mahadiscom.in

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular