Election of Ramesh Madavi to the post of Bhenvi Upsarpanch in Rajura Taluka
चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील मौजा भेंडवी ग्रामपंचायत येथे आज झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार रमेश मडावी यांनी भाजप उमेदवाराचा पराभव करून उपसरपंच पद प्राप्त केले.
त्यांच्या या विजयाबद्दल आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, भेंडवीचे सरपंच श्यामराव कोटनाके, ग्रा. प. सदस्य मोफत कुरसंगे, तानीबाई गोविंदराव मडावी, तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कोरवते, गावातली प्रतिष्ठ नागरिक सुभाष मंडीगा, युवा कार्यकर्ता कृष्णा कोटनाके, निंबाराव कुमरे यासह अनेकांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.