Drone spraying demonstration was successfully completed in the presence of the District Collector
चंद्रपूर :- जिल्हाचे जिल्हाधिकारी विनय गौडा व आत्मा प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर यांच्या पुढाकाराने शाश्वत विकास कार्यक्रम २०२३-२४ च्या नाविन्यपूर्ण उपर्क्रमाअंतर्गत कृषक स्वराज स्पाईसेस शेतकरी उत्पादक कंपनी, राजुराला कृषी ड्रोन उपलब्ध देण्यात आला होता, त्या निमित्याने कृषी ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक आज पंचाळा येथे पार पडले. Drone spraying demonstration
या प्रसंगी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जान्सन, उपविभागीय दंडाधिकारी रवींद्र माने, Atma Project आत्मा प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर, उपविभागीय कृषी अधिकारी राजूरा गिरीश कुलकर्णी व तालुका कृषी अधिकारी विनायक पायघन उपस्थित होते.

या भेटीमध्ये सर्व मान्यवरांनी कृषक स्वराज स्पाईसेस शेतकरी उत्पादक कंपनीच्या मागील दोन वर्षातील कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. Krishak Swaraj Spices Farmers Producer Company कृषक स्वराज मार्फत सुरु असणाऱ्या विविध प्रकल्पांना भेटी देऊन संपूर्ण काम प्रत्यक्षपणे समजून घेतले. सर्व मान्यवरांनी कृषक स्वराजच्या कामाचे कौतुक केले, आवश्यक सूचना व भविष्यातील वाटचालीबाबत शुभेच्छा देण्यात आल्या.
हा संपूर्ण कार्यक्रम आत्मा प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर यांच्या प्रयत्नाने व उपविभागीय कृषी अधिकारी गिरीश कुलकर्णी यांच्या नियोजनाने यशस्वीरीत्या पार पडला.
कृषक स्वराजचे काम जिल्ह्यातील उच्चपदस्थ अधिकारी वर्गांना समजावून सांगण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषक स्वराज परिवाराकडून आभार मानण्यात आले.