Drama Training Camp at Dr.Babasaheb Ambedkar International Cultural Centre, Bhadravati.
Training opportunity for new youth
चंद्रपूर :- लोकजागृती संस्था चंद्रपूर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर टाकळी, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सात दिवसीय अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
या प्रशिक्षणाचा कालावधी सात दिवसाचा असून यासाठी तज्ञ म्हणून मुंबई व दिल्लीचे विशेष मार्गदर्शक येणार आहेत. 19 जून ते 25 जून या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटरच्या अडीच एकरातील प्रशस्त आवारातील महात्मा फुले सभागृह येथे संपन्न होणार असून छत्रपती शिवाजी महाराज खुले रंगमंदिर येथे नाटकाची रंगीत तालीम होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणाऱ्या या प्रशिक्षणात बॉडी मूव्हमेंट, व्हॉइस, स्पीच, इम्प्रोवाईजेशन यावर शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. Dr.Babasaheb Ambedkar International Cultural Centre

यामध्ये भाग घेणाऱ्या कलावंतांना नाटकात काम करण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. Training opportunity for new youth
तरी जास्तीत जास्त कलावंतांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कल्चरल सेंटर चे व्यवस्थापकीय संचालक व राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले नाट्य दिग्दर्शक अनिरुद्ध वनकर यांनी केले आहे.
इच्छुक कलावंतांनी टाकळी भद्रावती येथील प्रशिक्षणाच्या स्थळी येऊन प्रवेश निश्चित करावा.