Dr. Gavture couple joined the Congress party in the presence of Nanabhau Patole
चंद्रपूर :- आज दिनांक 2 एप्रिल 2024 ला सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ अभिलाषा गावतुरे व डॉ राकेश गावतुरे यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी काँग्रेस किसान सेल चे जिल्हाअध्यक्ष दीपक पाटील वाढई तसेच सचिव विक्रमजी गुरनुले हे सुद्धा उपस्थित होते.
तत्कालीन परिस्थितीप्रमाणे मंत्री श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे लोकसभेच्या निवडणुकीत चंद्रपूर क्षेत्राचे भाजपाचे उमेदवार आहेत तसेच नामदार प्रतिभाताई सुरेश धानोरकर या काँग्रेस पक्षाच्या वतीने चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. यादरम्यान जनतेच्या मनातील भावी खासदार नामदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना उसळलेल्या प्रचंड जनसमुदायाला बघून धास्तावलेले ना मुनगंटीवार यांनी भाजपाच्या अनेक पक्षाचे तसेच काँग्रेस पक्षातील अनेक बड्या नेत्यांना भाजप पक्षात घेतले.
अशा प्रकारे पक्ष फोडींच्या प्रत्युत्तर म्हणून नामदार नानाभाऊ पटोले यांनी चंद्रपुरातील बहुजन चळवळीच्या व सामाजिक क्षेत्रातील सर्वमान्य नेतृत्व डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांना काँग्रेस पक्षात सामावून घेतले. त्यामुळे ‘सौ सोनार की एक लोहार की ‘ या म्हणीला साजेशी कृती नाना भाऊ पटोले यांनी केलेली आहे. असे सर्वसामान्य जनतेतून बोलले जात आहे. ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत डॉ अभिलाषा गावतुरे व डॉ राकेश गावतुरे यांच्यासारख्या मुत्सद्दी व वैचारिक वारसा लाभलेले नेतृत्व नानाभाऊ पटोले यांच्यामार्फत काँग्रेसमध्ये दाखल होणे म्हणजे प्रतिभाताई धानोरकर यांचे पारडे निश्चितच जड होईल असे बोलले जात आहे.
गावतुरे दाम्पत्यांचे गेल्या पंधरा वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्याच्या बहुजन चळवळीमध्ये तसेच ओबीसी चळवळीमध्ये मोठे योगदान आहे. 2020 च्या संविधान दिनी निघालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ओबीसी मोर्चाचे नेतृत्व केले. आरोग्य क्षेत्रामध्ये कोरोना काळामध्ये डॉ अभिलाषा गावतुरे यांनी दिलेली निस्वार्थ सेवा याची दखल तर केवळ महाराष्ट्र नाही तर राष्ट्रीय मीडियाने सुद्धा घेतली होती. त्यांच्या भूमिपुत्र ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे करिअर मार्गदर्शन असो कामगारांचा हक्काचा लढा असो वा गाव तिथे वाचनालय ही मोहीम असो, महिला सक्षमीकरणाची चळवळ असो, चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य शिबीराच्या मार्फत रुग्णांना आरोग्य सेवा देणे, तसेच बाल रोग तज्ञांच्या संघटनेचे सचिव असताना कुपोषित बालकांना दत्तक घेऊन त्यांचा मोफत उपचार आणि संगोपन करण्याचे मोठे कार्य असो, वन्यजीव प्राण्यांच्या संघर्षांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांचा प्रश्न उचलून धरणे, आदिवासींच्या हक्काच्या लढ्यामध्ये त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे या मुळे जिल्हाभरातील विशेष करून बल्लारपूर – मुल विधानसभेमधून त्यांचा मोठा कार्यकर्ता वर्ग निर्माण झालेला आहे.
डॉ राकेश गावतुरे यांचे वडील हे काँग्रेस सेवादलाचे आजीवन सदस्य आहेत त्यामुळे डॉ राकेश गावतुरे यांना सामाजिक बांधिलकीचे बाळकडू घरातूनच मिळाल्याने ते काँग्रेस पक्षाच्या वतीने संविधान वाचवण्याच्या लढाईत अग्रणी शिलेदाराच्या भूमिकेत असतील याची चर्चा समाजातील सर्व स्तरातून होत आहे.
गावतुरे दाम्पत्यांचा पक्ष प्रवेशा मुळे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस मध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे, गावतुरे दाम्पत्याच्या काँग्रेस प्रवेशाने चंद्रपूर लोकसभेतील समीकरणे नक्कीच बदलतील अशी आशा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पल्लवित झाली आहे.
यावेळी डॉ गावतुरे म्हणाल्या की आम्ही साविधांनाच्या रक्षणार्थ काँग्रेस च्या समर्थनार्थ लोकशाही वाचविण्यासाठी पूर्ण ताकदीने उतरलो आहोत आणि विजय नक्की सत्याचा होईल.