Sunday, April 21, 2024
HomeEducationalडॉ हेमचंद दुधगवळी यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

डॉ हेमचंद दुधगवळी यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Dr. Babasaheb Ambedkar National Model Teacher Award announced to Dr. Hemchand Dudhgawali

चंद्रपूर :- शरदचंद्र पवार महाविद्यालय, गडचांदूर येथील मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉ. प्रा. हेमचंद दुधगवळी यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. Dr. Babasaheb Ambedkar National Model Teacher Award

जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी नागपूर येथील मधुरम सभागृह, विदर्भ हिंदी साहित्य संमेलन, झांशी राणी चौक येथे नामवंत व्यक्तीच्या उपस्थितीत डॉ. हेमचंद दुधगवळी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

शिक्षण सेवेत तसेच समाजसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून घेणारे गडचांदूर येथील डॉ. हेमचंद दुधगवळी यांच्या निस्वार्थ कार्याची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाने दखल घेत त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केला. Dr. Babasaheb Ambedkar National Model Teacher Award announced to Dr. Hemchand Dudhgawali by World Ambedkar Literary Corporation

डॉ. दुधगवळी यांना पुरस्कार जाहीर झाल्याने महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकवर्ग, समाजसेवक तसेच त्यांच्या हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular