Friday, March 21, 2025
HomeAgricultureशेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा नको अमलबजावणी करा.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा नको अमलबजावणी करा.

Don’t make announcements regarding farmers’ loan waiver, implement…: Otherwise we will do MNS style agitation for farmers’ loan waiver

चंद्रपूर : -तत्कालीन महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी केलेली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना व तत्कालीन महाविकास आघाडी चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thakre यांनी केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना, व 50 हजार प्रोत्साहन राशीं मिळण्यापासून वंचित शेतकऱ्यांना मदत मिळावी याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्या नेतृत्वात वरोरा तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला होता,  तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते व हिवाळी अधिवेधान काळात टेमुर्डा येथे रस्तारोको आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यात आले होते,

एवढेच नव्हे तर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन जाऊन कर्जमाफी चा विषय मांडण्यात आला होता,

दरम्यान मनसेच्या सर्व आंदोलनाची दखल व मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा शिष्टाचार कामाला आला आणि डिसेंबर 2023 च्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेपासून (2017) वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा करण्यात आली, Don’t make announcements regarding farmers’ loan waiver, implement

मात्र त्यासाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात करणार असे सांगण्यात आले, परंतु लोकसभा निवडणूकीच्या अगोदर अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन दिवसात गुंडाळले गेले आणि शेतकरी कर्जमाफिचा विषय मागे पडला, मात्र आता चालू पावसाळी अधिवेशनात पुन्हा शेतकऱ्यांच्या कर्जमाफिची घोषणा करण्यात आली

पण सरकार केवळ घोषणाचं करतंय पण अमलबजावणी झाली पाहिजे, हें सरकार थापा मारताहेत म्हणून त्वरित अमलबजावणी करा अन्यथा कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांसाठी मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे, यावेळी वरोरा तालुक्यातील असंख्य शेतकरी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेपासून (2017) व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजना सन 2020-21 मधील पीक कर्जमाफीपासून वंचित असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याची घोषणा राज्य विधिमंडळाच्या 2023 च्या हिवाळी अधिवेशनात झाली होती. मात्र, अद्यापही याबाबत जिल्हास्तरावर कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसून कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना लाभ केव्हा मिळेल? याची प्रतीक्षा लागून आहे.

दरम्यान पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे, पण केवळ घोषणा देऊन चालणार नाही तर शेतजऱ्यांच्या सततच्या नापिकी व अस्मानी सुलतानी संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात हवा आहे,

मागील वर्षी सरासरी कमी उत्पादन झाले असतांना सरकारने सोयाबीन व कापसाला भाव दिला नाही, पर्यायाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे व अशा स्थितीत शेतकरी आत्महत्यास प्रवृत्त होऊ शकतो त्यामुळे कर्जमाफी पासून वंचित शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी द्यावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करिता मोठे जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा राजू कुकडे यांनी दिला आहे, Otherwise we will do MNS style agitation for farmers’ loan waiver

यावेळी मनसे जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, मनसे तालुका उपाध्यक्ष प्रशांत बदकी, प्रतीक मुडे, शेतकरी सेना पदाधिकारी भदुजी गिरसावळे, श्रीकृष्ण पाकमोडे व इतर मनसे पदाधिकारी व असंख्य शेतकरी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular