Monday, March 17, 2025
HomePoliticalमहाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांचे आंदोलन चीघडू देऊ नका - आम...

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगारांचे आंदोलन चीघडू देऊ नका – आम आदमी पार्टी

Don’t let the protest of Maharashtra State Electricity Board contract workers escalate – Aam Aadmi Party

★ महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समितीच्या आंदोलनाला आम आदमी पार्टी चे समर्थन

चंद्रपूर :- राज्यात महानिर्मिती, महावितरण, महापारेषण कंत्राटी कामगार आपल्या संविधानिक मागण्यां ज्यामध्ये कामगारांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्यास 17 मागण्याना घेऊन अनिश्चित काळापर्यंत काम बंद आंदोलन पुकारलेले असून कामगाराच्या संविधानिक मागण्यांना आम आदमी पार्टी तर्फे समर्थन देण्यात आले.

आम आदमी पार्टीचे चंद्रपूरचे वरिष्ठ नेते सुनील मुसळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आप हा नेहमी कामगाराच्या बाजूने लढत आलेला आहे. याच्यापूर्वी सुद्धा सी टी पी एस मधील कामगारांना कामावर घेण्यासंदर्भातील आंदोलन असो अथवा प्रकल्पग्रस्त चिमणीवरील आंदोलन असो प्रत्येक वेळेला आम आदमी पार्टीने कामगाराच्या बाजूने आपली लढाई लढली यापुढेही आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असे आश्वासन कामगारांना देत आपले समर्थन दर्शविले. AAP
आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे आपले मत मांडताना म्हणाले केजरीवाल सरकार कामगारांच्या समस्या कायमस्वरूपी निकाली लावण्याकरिता सर्व कंत्राटी कामगारांना परमनंट करत आहेत. प्रायव्हेट कंपनीला सरकार विकत घेऊन सरकार फायद्यात चालवत आहे. हे जर आम आदमी पार्टी करू शकते तर भाजपा सरकार का नाही करत असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले कंत्राटी पद्दत कामगारांचे शोषण करण्याकरिता आणि भ्रष्ट्राचार करण्याकरीता असते, महाराष्ट्र राज्यातील सरकार कंत्राटीकरणावर जास्त प्रमाणात भर देत असून कामगारांचे शोषण करत आहे हे सरकार निवडणुकीच्या तोंडावर कामगारांना उन्हामध्ये तडफडत ठेवत असून येत्या निवडणुकीत सत्ताधीशांना घरी बसवण्याचं काम कामगारांनी करावं असे ते म्हणाले. Agitation of Maharashtra State Electricity Board Contract Labor Union Action Committee

यावेळेला समर्थन देण्याकरिता आपचे नेते सुनील मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, जिल्हा संघटनमंत्री भिवराज सोनी, जिल्हा उपाध्यक्ष योगेश मुरेकर, महानगर महिला अध्यक्ष एड. तब्बसूम शेख, महानगर संघटन मंत्री संतोष बोपचे, युवा जिल्हा संघटन मंत्री अनुप तेलतुंबडे, पवन प्रसाद, सोहेब पटेल, सुनील सदभया, मनीष राऊत, इत्यादी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular