Thursday, February 22, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनइन्फंट येथे दिपोत्सव उत्साहात साजरा.

इन्फंट येथे दिपोत्सव उत्साहात साजरा.

Diwali Deepotsav is celebrated with enthusiasm at Infant School                           चंद्रपूर :- इन्फंट जिजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे दिपोत्सव २०२३ चे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा करून दिवाळीच्या पाच दिवसांचे नाटयीकरण धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लब्बीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज या पाच दिवसाचे आणि दिवाळी सनाचे महत्त्व यातून समजावून देण्यात आले.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कृतीयुक्त वस्तूंची प्रदर्शनी भरविण्यात आली. यावेळी रांगोळी स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले. सुंदर रांगोळ्यांनी परिसर सजविण्यात आला होता. पालक, विद्यार्थ्यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने या संपूर्ण आयोजनाचे निरीक्षण केले.

या प्रसंगी संस्थेचे सविच माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular