Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
Homeक्रीडा व मनोरंजनजिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक : नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण व सत्कार.

जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक : नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण व सत्कार.

District Youth Congress Review Meeting: Inauguration and felicitation of newly appointed office bearers.                                   चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसची आढावा बैठक श्रमिक पत्रकार संघ वरोरा नाका चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांच्या नियोजनात उत्कृष्टपणे पार पडली.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रोहित कुमार, विशेष अतिथी चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रितेश तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष नम्रताताई ठेमस्कर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष दिनेश चोखारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव याज्ञवलक्य जिचकार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अश्विन बैस आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन युवक काँग्रेसच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हातील सर्व युवक तालुकाध्यक्ष व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण आणि सत्कार सोहळा थाटात पार पडला.

यात युवक काँग्रेस जिल्हा महासचिव पदी प्राजू शिंगरू, सचिन उपरे यांची तर चंद्रपूर तालुका महासचिव अतुल हागे, सचिव हर्षल येलमुले, नियुक्ती करण्यात आली. राजुरा विधानसभा अध्यक्ष उमेश गोनेलवार, उपाध्यक्ष अशोक राव, महासचिव रूपेश चुदरी, दिपक खेकारे, निरंजन मंडल, राजुरा यु. काँ. तालुकाध्यक्ष इर्षाद शेख, शहराध्यक्ष रामेश्वर ढवस, शहर उपाध्यक्ष श्रिकांत चिंतलवार, सचिव भुषण राठोड, गडचांदूर शहराध्यक्ष महावीर कथोड, शहर सचिव इंदर कश्यप, कोरपना तालुकाध्यक्ष प्रेम बोंडे, उपाध्यक्ष स्वप्नील माणूसमारे, कार्याध्यक्ष रोषण मरापे, गोंडपीपरी युवक तालुकाध्यक्ष विपीन पेद्दुलवार, उपाध्यक्ष शुभम पिंपळकर, बल्लारपूर विधानसभा महासचिव जितू चुदरी, तालुकाध्यक्ष अखिल गेडाम, शहराध्यक्ष अरविंद वर्मा, पोंभुर्णा युवक तालुकाध्यक्ष हेमंत आरेकर, मुल युवक तालुका उपाध्यक्ष हिमानी वाकुडकर, सिंदेवाही युवक तालुकाध्यक्ष अभिजीत मुप्पिडवार, सावली शहराध्यक्ष अमरदिप कोनपट्टीवार, नागभीड तालुकाध्यक्ष सौरव मुळे, चिमूर तालुकाध्यक्ष नागेंद्र चट्टे, शहराध्यक्ष अक्षय लांजेवार, आदींना नियुक्तीपत्र देऊन पदग्रहण सोहळा घेण्यात आला. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रभारी रोहित कुमार यांनी आपल्या मार्गदर्शनात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर काँग्रेसला बळकट करण्यासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. Bharat Jodo बुथ जोडो युथ जोडो अभियान अधिक व्यापक करण्याच्या सूचना दिल्या. तर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी आपल्या मार्गदर्शनात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि येणाऱ्या काळात युवक काँग्रेसमध्ये नवीन युवक – युवतींना जोडून जिल्हात काँग्रेसमय वातावरण तयार करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी एन.एस.यु.आय चे जिल्हाध्यक्ष शफाक शेख, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, सुमित आरेकर, ऋषी मुके यासह जिल्हा युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular