Monday, March 17, 2025
HomeAccidentनुकसानग्रस्तांना महेश मेंढेची ताडपत्री व आर्थिक मदत

नुकसानग्रस्तांना महेश मेंढेची ताडपत्री व आर्थिक मदत

Financial assistance and distribution of Talapatri to the needy affected by heavy rains
Avanti – Amber Social Foundation, an initiative of Congress leader Mahesh Mendhe

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने भिवापूर वॉर्ड, शिवाजी नगर परीसरातील पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली होती अश्या झोपडपट्टीवाशीय गोरगरीब गरजू लोकांना आर्थिक मदत व ताळपत्रीचे वितरण अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, चंद्रपूरचे अध्यक्ष काँग्रेसचे नेते महेश मेंढे Congress Leader Mahesh Mendhe यांच्या तर्फे करण्यात आले.

मुसळधार पावसाने मागील सहा दिवसापासून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून होणाऱ्या मानवी मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे. पाऊस वाऱ्याने अनेक घरांची छप्परे उन्मळून पडली आहेत. ज्यांच्या घराचे नुकसान झाले आहे, वादळामुळे छप्पर उखडले आहे अशा कुटुंबांच्या मदतीसाठी महेश मेंढे यांनी तात्काळ धाव घेतली असून तात्काळ मदतीसाठी ताडपत्री उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच काही गरजूना आर्थिक मदत देण्यात आली.

मुसळधार पावसामुळे घरांच्या आतील भागांना अधिक नुकसान होऊ नये म्हणून या ताडपत्री तात्पुरत्या छप्पर म्हणून वापरल्या जातील. त्यामुळे त्यांना थोडा सहारा मिळेल या उद्देशाने त्यांना ताळपत्रीचे वाटप करण्यात आले. ताळपत्री वाटप कार्यक्रमामुळे गोरगरीब गरजू लोकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

सदर उपक्रमात लोकांचा मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यावेळी मीराबाई लक्ष्मण जंगळे, नीता घनश्याम वालदे, नविना गणेश अवचारे, हनुमान नरसंहरू सेंगेरप, भारत सेंगेरप, कमलाबाई देवांगण, पिंकी शंकर बंदरकर यांना मदत करण्यात आली.

यावेळी आर्थिक मदत व ताळपत्रीचे वाटप करतांना अवंती – अंबर सामाजिक प्रतिष्ठान, काँग्रेसचे नेते महेश मेंढे यांचेसह मनपाचे माजी उपमहापौर वसंतदादा देशमुख, समाजसेविका सौ. वैशाली चंदनखेडे, सामाजिक कार्यकर्ता प्रकाश चंदनखेडे, उपसरपंच रोशन रामटेके, अविनाश मेश्राम, समीर सोनवाने, सर्वेश पिसे, राहुल बंडावार, सचिन रणदिवे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular