Distribution of snacks to relatives of patients: Fuse initiative of BRS
चंद्रपूर :- बीआरएसने एक घास आपुलकीचा हा उपक्रम सुरु केला आहे. राजुरा विधानसभातील प्रत्येक उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालय, आरोग्य केंद्रात हा उपक्रम राबवीला जाणार आहे.रुग्णालयात आलेल्या रुग्णांचा नातेवाईकांना अल्पोहाराचे देण्यात येणार आहे.आज राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात BRS बीआरएसचे नेते भूषण फुसे यांच्या हस्ते या उपक्रमाला सुरवात झाली.
उपचारासाठी आलेल्या रुग्णासोबत त्यांचे नातेवाईक येत असतात.रुग्ण बरे होईस्तोवर त्यांना थांबावे लागते. अश्यात त्यांची खाण्यापिण्याची मोठी गैरसोय होत असते.अश्यात बीआरएसने हाती घेतलेला उपक्रम आपुलकीचा ठरला आहे.राजुरा विधानसभा क्षेत्रात बीआरएस तर्फे एक घास आपुलकीचा हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
आज राजुरा येथील उप जिल्हा रुग्णालयात या उपक्रमाची सुरवात झाली. यावेळी नेते भूषण फुसे,ज्योतीताई नळे, अनुसूर्याताई नूती, राकेश चीलकुलवार, धनंजय बोर्डे, महेंद्र ठाकूर, सुभाष हजारे उपस्थित होते.