Distribution of sherbet on behalf of Young Chanda Brigade in District Jail premises on the occasion of Muharram
चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :- मोहरम Moharam निमित्त चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वितरण करण्यात आले. Young Chanda Brigade
यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन, सलीम शेख, ताहिर हुसेन, अबरार शेख, रजिक खान, असलम शेख, शहबाज खान, प्रवीण कुलटे, सायली येरणे, अनिता झाडे, माधुरी निवलकर, नंद पंधरे, शांता धांडे, अल्का मेश्राम आदींची उपस्थिती होती.
हजरत हुसेन रजी हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामूळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरमच्या नवमी आणि दहावीला चंद्रपूरातील कारागृहात असलेला हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली यांचा दर्गा सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो. यंदाही या दिवशी कारागृहातील दरवाजे खुले करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भाविकांची सेवा म्हणून येथे पोहोचलेल्या हजारो भाविकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले.
मोहरमच्या पवित्र दिवशी, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शरबत वाटप करून यंग चांदा ब्रिगेडने सामाजिक आणि धार्मिक सेवा दिली.