Distribution of sabudana khichdi and fruits to Shiva devotees on the occasion of Mahashivratri : Social activity of Kamal Sporting Club
चंद्रपूर :- कमल स्पोर्टीग क्लबच्या वतिने दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना साबुदाना खिचडी व फळवितरण करण्यात आले. दि. ०८ मार्च २०२४ रोजी सकाळी ०६ वाजेपासून चंद्रपूर येथील अंचलेश्वर मंदीरामध्ये कमल स्पोर्टीग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास हरिश्चंद्र अहीर, भाजपा ज्येष्ठ नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल फुलझेले, राजु घरोटे, श्यामल अहीर, हर्षवर्धन अहीर, प्रदिप किरमे, राजेश वाकोडे, स्वप्नील मुन, राहुल गायकवाड, राजवीर चौधरी, कमल कजलीवाले, प्रणय डंभारे, चेतन शर्मा, राहुल बोरकर, शुभम लोणकर यांचे सह स्पोर्टीग क्लबचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
अंचलेश्वर मंदीर येथे पुजाअर्चना करणारे शिवभक्त, भाविकबांधव व आबाल वृध्दांना उपस्थित मान्यवरांनी खिचडी व फलवितरण करून सर्व उपस्थितांना महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या.