Distribution of ration kits to disabled people on behalf of Lalpeth Wcl Labor Association. चंद्रपूर :- दिवाळी सण सामान्य माणसाप्रमाणे दिव्यांग बांधवांनीही सुखा समाधानाने साजरी करावी ही सामाजिक बांधिलकी जपत हिंदुस्तान लालपेठ ओपन कॉस्ट कामगार सहकारी पत संस्थेच्या वतीने नांदगाव येथील 40 दिव्यांग महिला, पुरुष बांधव, भगिनींना शिधा वाटप करण्यात आले.
नांदगाव (पोडे) येथील आदिवासी सभागृह येथे गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी हिंदुस्तान लालपेठ वेकोली चे उप क्षेत्रीय प्रबंधक तरुण देवडा यांच्या हस्ते, तसेच नांदगाव ग्रामपंचायत चे सरपंच वनिता वैद्य व उपसरपंच मलेश कोडारी यांच्या उपस्थितीत वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून दिव्यांगांना शिधा वाटप करण्यात आले.
यावेळी हिंदुस्तान लालपेठ ओपन कॉस्ट कामगार सहकारी पत संस्था मर्यादित चंद्रपूर चे अध्यक्ष आफताब अहमद, सचिव व्यंकटेश मुरा, उपाध्यक्ष नागेश बंडीवार, सहसचिव राजेंद्र तराळे, संचालक राकेश शेंडे, गुरू वैद्य, भारत कुंभारे, पद्मा कोरवेणी, हर्षाली जुलमे, श्रीमती चंदा मेश्राम व दिव्यांग महिला, पुरुष व अनेक नांदगाव वासीयांची उपस्थिती होती.
हिंदुस्तान लालपेठ ओपन कॉस्ट कामगार सहकारी पत संस्था मर्यादित चंद्रपूर च्या या शिधा वाटपाच्या उपक्रमाने दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड केल्याचे समाधान यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर दिसून आले.