Thursday, February 22, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनचंद्रपुरातील शासकीय, प्रशासकीय कार्यालयात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने नववर्ष दिनदर्शिका वाटप

चंद्रपुरातील शासकीय, प्रशासकीय कार्यालयात ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने नववर्ष दिनदर्शिका वाटप

Distribution of New Year Calendar on behalf of Consumer Protection Committee at Government, Administrative Offices in Chandrapur

◆ ग्राहकांनी आर्थिक पिळवणुक व लूट होत असल्यास ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे सहकार्य घेण्याचे आवाहन

चंद्रपुर :- ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी ग्राहक हक्क कायदा काय असतो? त्याचा मानवाधिकारांशी असलेला संबंध, कुठल्याही क्षेत्रात किंवा कुठल्याही बाबतीत खरेदी विक्री ही क्रिया सदोष आढळल्यास किंवा ग्राहकांची फसगत झाल्यास त्याने न्याय कुठे मांगावा? तक्रार कुठे करावी? अश्या अनेक समस्यांकरीता ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती निरंतर कार्यरत असून 2024 या नविन वर्षात देखील चंद्रपुरात ग्राहकांची होत असलेली आर्थिक पिळवणुक व लूटीविरोधात तसेच ग्राहकांच्या हक्कासाठी लढा देत राहिल

यासंदर्भात जनजागृती करण्याच्या हेतूने नववर्षाचे औचित्य साधून या निमित्ताने ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष, संतोष दशरथ पारखी यांच्या मार्फत ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीची राष्ट्रीय, राज्य व जिल्हा कार्यकारणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने नविन वर्षाची भेट म्हणून चंद्रपुर जिल्ह्यातील शासकीय व प्रशासकीय कार्यालयात 2024 नववर्षाचे दिनदर्शिका वाटप पोलिस स्टेशन दुर्गापुरच्या निरिक्षक सौ. लता वाढीवे, ग्राम पंचायत उर्जानगरच्या सरपंच सौ. मंजूषा येरगुडे, ग्राम विकास अधिकारी श्री युवराज वेस्कडे यांना करतांना ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे चंद्रपुर जिल्हाध्यक्ष संतोष पारखी, जिल्हा उपाध्यक्ष संजयकुमार शिंदे, कायदेशीर सल्लागार अॅड रवि धवन, सदस्य राजू रायपुरे, सदस्य गजानन सवळे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular