Tuesday, March 25, 2025
Homeउद्योगराष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशानुसार केपीसीएल प्रकल्पग्रस्तांना धनादेशाचे वितरण

राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या निर्देशानुसार केपीसीएल प्रकल्पग्रस्तांना धनादेशाचे वितरण

Distribution of checks to KPCL project victims as directed by National OBC Commission Chairman Hansraj Ahir

चंद्रपूर :- राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा पुर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर National Chairman of National Commission for Backward Classes and former Union Minister of State for Home Hansraj Ahir यांच्या निर्देशानुसार अखेर केपीसीएल बरांज कोलमाईन्सच्या शेकडो ओबीसी व अन्य प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या उपस्थितीत कंपनीद्वारा लाखो रूपयांचे धनादेश वितरीत करण्यात आले. KPCL Baranj Coalmines

या धनादेश वितरण कार्यक्रमास जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी, जिल्हा पोलिस अधिक्षक सुदर्शन मुम्मका, वरोराचे उपविभागीय अधिकारी, वरोरा उपविभागीय पोलिस अधिकारी, भद्रावतीचे तहसिलदार, केपीसीएलचे अधिकारी, भाजपाचे माजी नगरसेवक प्रशांत डाखरे, संजय रॉय, रामा मत्ते, दत्तु पाटील गुंडावार, सरपंच राजू डोंगे, बरांज उपसरपंच रमेश भुक्या व कोलमाईन्स प्रकल्पग्रस्त बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

केपीसीएलच्या बरांज कोलमाईन्स मागासवर्गीय प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांची गांभिर्याने दखल घेवून ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी केपीसीएल व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची अनेकदा सुनावणी घेत हा प्रलंबित प्रश्न अखेर धसास लावला आहे. हंसराज अहीर यांनी येथील प्रकल्पग्रस्तांना मोबदला देण्याची प्रकीया तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार बुधवार दि. ०६ मार्च २०२४ रोजी नियोजन भवन चंद्रपूर येथे जिल्हाप्रशासनातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केपीसीएलने हे धनादेश प्रकल्पग्रस्तांना वितरीत केले. अन्य प्रलंबित प्रश्न राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाद्वारे प्राप्त निर्देशाच्या अनुशंगाने मार्गी लावले जातील असे केपीसीएलद्वारा स्पष्ट करण्यात आले.

यावेळी धनादेश स्विकारणाऱ्या प्रकल्पग्रस्तांनी ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध् यक्ष हंसराज अहीर यांचे विशेष आभार मानले. या धनादेश वितरणच्या पार्श्वभूमिवर हंसराज अहीर यांनी बरांज केपीसीएलच्या बरांज कोलमाईन्स प्रकल्पग्रस्तांचे अन्य प्रलंबित प्रश्नही लवकरच सोडवू असे सांगितले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular