Sunday, December 8, 2024
Homeआरोग्यथंडीपासून बचावण्याकरीता गरिबांना ब्लॅंकेटचे वाटप ; डॉ. अशोक जीवतोडे मित्र परिवाराचा नवीन...
spot_img
spot_img

थंडीपासून बचावण्याकरीता गरिबांना ब्लॅंकेटचे वाटप ; डॉ. अशोक जीवतोडे मित्र परिवाराचा नवीन वर्ष निमित्याने अनोखा उपक्रम

Distribution of blankets to the poor to protect them from cold;  Dr.  Ashok Jeevtode Mitra Parivar’s unique activity on the occasion of New Year

चंद्रपूर :- सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. सर्वसामान्य व्यक्ती आपली थंडी उबदार कपडे घालून कमी करू शकतो. मात्र जे वंचित, निराधार, गोरगरीब आहेत त्यांच्या पोटाची खडकी भरतानाच अडचण येते तर त्यांनी गरम कपडे कधी खरेदी करायचे? अशा वंचितांना आधार देण्यासाठी त्यांची थंडी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न डॉ. अशोक जीवतोडे मित्र परिवारातर्फे चंद्रपूर शहरात गरजवंतांना ब्लॅंकेट वाटप करून त्यांना मदत करण्यात आली.

डॉ अशोक जीवतोडे मित्रपरिवार सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असतात. ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे हे विदर्भातील सामजिक चळवळीत नेहमीच पुढे असताना दिसतात. या नववर्षानिमित्त डॉ. अशोक जीवतोडे मित्र परिवारातर्फे शहरातील गरजवंतांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी मंगेश पाचभाई, राहुल ठाकूर, अनिकेत सातपुते, गौरव कोळेकर, गौरव पोहेकर, जयेश बूछे, अभिनव किनेकर आदी सहकारी उपस्थिती होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular