Thursday, February 22, 2024
HomeBudgetआश्वासनाचे गाजर दाखवणारा निराशाजनक अर्थसंकल्प - आमदार सुभाष धोटे.

आश्वासनाचे गाजर दाखवणारा निराशाजनक अर्थसंकल्प – आमदार सुभाष धोटे.

Disappointing budget showing carrot of promise – MLA Subhash Dhote

चंद्रपूर :- येणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी निवडणूकांपुर्ते आश्वासनाचे गाजर दाखवणारा निराशाजनक अर्थसंकल्प केंद्र सरकारकडून सादर करण्यात आला असून,

यात शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवक, महिला, उद्योजक, व्यापारी, कर्मचारी, मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेच्या पदरी घोर निराशाच पडली आहे.

प्रत्यक्षात या सर्व घटकांना मागील दहा वर्षांपासून जी मोठ मोठी आश्वासने केंद्र सरकारने दिली त्यांची पुर्तता करण्यासाठी ठोस पावले उचलून भरीव तरतूदी अर्थसंकल्पात करण्याची गरज होती.

मात्र सर्वसामान्य माणसाच्या वेदनांवर केवळ आश्वासनांचे गाजर दाखविण्यात आले आहे.

देशातील, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव नसल्याने अन्नदाता विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे त्यासाठी कुठलेही धोरण नाही,

महागाई कमी करण्यासाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही अशी प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular