Thursday, November 30, 2023
Homeधार्मिक६७ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी चंद्रपूर दिक्षाभूमि सज्ज

६७ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी चंद्रपूर दिक्षाभूमि सज्ज

Diksha Bhoomi Chandrapur ready for 67th Dhammachakra Reintroduction ceremony   चंद्रपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माचे पुनरूज्जीवन व धम्मक्रांतीला गतिमान करयासाठी चंद्रपूरच्या ऐतिहासिक व पवित्र दीक्षाभूमिवर दिनांक १६ ऑक्टोबर १९५६ ला बौध्द धम्माची दीक्षा दिली.

त्याप्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुध्दा धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभ दि. १५ व १६ ऑक्टोबर २०२३ दिनी श्रद्धेय भिक्खुगण, बौध्द एवं आंबेडकरी विचारवंत, समीक्षक, साहित्यिक, देशविदेशातील प्रसिध्द अभ्यासक यांच्या प्रबोधनार्थ वैभवशाली, जनसृष्टीप्रिय, विविधांगी कार्यक्रमांनी सजलेली पवित्र चंद्रपूर दीक्षाभूमि आधुनिक संपन्नतेने धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभासाठी पूर्णतः सज्ज आहे.

पुस्तकांचे स्टॉल्स, आरोग्य विभाग, समाजसेवी संघटना यांनी आपापले स्टॉल बुक केले आहे. समारंभाची सर्वोत्तम उपलब्धी बोधिसत्व प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थिंचे जतन केलेला अस्थिकलश दर्शनार्थ उपलब्ध राहील.

थाईलैंड येथून प्राप्त दीक्षाभूमिवरील बुद्ध विहारात १६.५ फुट उंच अभय मुद्रेतील बुद्धरूपाचे दर्शन तसेच श्रद्धेय भिक्खू संघाकडून धम्म श्रवण द्वारा धम्ममय आनंदाची रूजवण. जगविख्यात बुद्धधम्म प्रचारकांकडून धम्म श्रवण द्वारा मानसवृद्धी समारंभाची अन्य विशेषता धम्मसंबधीत उपयुक्त वस्तुंचे स्टॉल्स, श्रीलंकेतील बोधीवृक्षाच्या शाखेचे दीक्षाभूमिवरील रोपणातून बहरलेल्या बोधिवृक्षाचे दर्शन, समारंभातील लक्षावधी लोकांचा संपर्काचा आनंद, धम्मदानाची सुवर्णसंधी, मोफत वैद्यकीय सेवा इत्यादी समारंभाची विशेषता आहे.

संपूर्ण दीक्षाभूमि परीसर रंगीबेरंगी रोशनाईने न्हाऊन निघाली आहे. त्याचप्रमाणे पंचशील ध्वज व पंचशील पताका स्वाभीमानाने हवेत डोलत आहेत.

या समारंभाची जवळपास पूर्ण तयारी झाली असून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतास दीक्षाभूमि सज्ज झाली आहे.

धम्मचक्र अनुप्रवर्तन समारंभा दरम्यान आयोजित दि. १५ ऑक्टोबर सायं. ४.०० वाजता वाहनासह मिरवणूक तसेच दि. १६ ऑक्टोबर सकाळी १०.०० वाजता बोधिसत्व प. पू. डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशासह मिरवणूकीत प्रचंड संख्येने उपस्थित राहून समारंभ यशस्वी करावा अशी विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटी चंद्रपूरचे अध्यक्ष अरूण घोटेकर व सचिव वामनराव मोडक यांनी केली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular