Thursday, February 22, 2024
Homeजिल्हाधिकारीजिल्ह्यात विकसीत भारत संकल्प यात्रेची सुरवात ; अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. देशपांडे यांनी...

जिल्ह्यात विकसीत भारत संकल्प यात्रेची सुरवात ; अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. देशपांडे यांनी दाखविली हिरवी झेंडी

Development of Bharat Sankalp Yatra started in the Chandrapur district: Additional Collector Shri.  Deshpande showed the green flag

अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. देशपांडे यांनी दाखविली हिरवी झेंडी

चंद्रपूर :- केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी योजनांची माहिती तसेच योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याच्या अनुषंगाने 15 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत ‘विकसीत भारत संकल्प यात्रा’ मोहीम राबविण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.23) सदर यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी वाहनांना हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळूंके उपस्थित होत्या.

मार्गदर्शन करतांना श्री. देशपांडे म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये आजपासून पुढील 60 दिवस विकसीत भारत संकल्प यात्रा फिरणार आहे. ग्रामीण भागासाठी सद्यस्थितीत सात वाहने असून केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची माहिती या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येईल. तसेच योजनांच्या लाभापासून जे नागरिक वंचित आहे, अशा नागरिकांचा शोध घेऊन त्यांनासुध्दा योजनांचा लाभ देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

यात्रेची उद्दिष्टे : आतापर्यंत लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे, विविध योजनांची जनजागृती, लाभार्थ्यांशी संवाद, त्यांचे अनुभव आणि पात्र लाभार्थ्यांना शोधून त्यांना लाभ देणे, हे या यात्रेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular