Deportation action against 3 Sarai criminals again in the background of Lok Sabha elections
चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सक्रिय होत, चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विशेष मोहीम राबवित सराईत गुन्हेगारांवर तडीपारची (हद्दपार) कारवाई करण्यात आली.
यात पहिल्या आठवडयात 3 सराईत गुन्हेगार व दुसऱ्या आठवडया मध्ये 3 अश्या एकूण 6 सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुक 2024 च्या तोंडावर जिल्हयात शांतता अबाधित राखण्याकरीता जिल्हयातील शरीरा विरुध्द व मालमत्ते विरुध्दचे सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यासंबंधाने पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनी आदेश पारीत करताच पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील शुभम अमर समुद, वय 26 वर्ष रा. पंचशिल वार्ड चंद्रपर, रामनगर पोलीस स्टेशन येथील शाहरूख नुरखा पठाण वय 29 वर्ष रा. अष्टभुजा वार्ड जयश्री लॉन जवळ चंद्रपूर, नैनेश उर्फ लाला नितीन शहा वय 31 वर्ष रा. लुंबिनी नगर बाबुपेठ वार्ड चंद्रपूर यांना तसेच मोहशन केशव कुचनकर वय 25 वर्ष रा. चिरघर लेआउट वरोरा ता. वरोरा यांना मागील आठवडयामध्ये कलम 56 (1) (अ) (ब) मपोका अन्वये 6 महिन्यात करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आलेले आहे.
तसेच दुसऱ्या आठवण्यात बल्लारशाह पोलीस स्टेशन येथील दर्शन उर्फ बापु अशोक तेलंग वय 22 वर्ष रा. मौलाना आझाद वार्ड बलारशाह, पोलीस स्टेशन नागभिड येथील मुनिर खान वहीद खान पठाण वय 55 वर्ष रा. शिवनगर नागभिड, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथील शिवशांत उर्फ भिस्सु दामोधर भुर्रे वय 25 वर्ष रा. हनुमान नगर ब्रम्हपुरी ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर यांना कलम 56 (1) (अ) (ब) मपोका अन्वये 3 व 6 महिन्यात करीता चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आले आहे.
सदर कारवाई मुम्मका सुदर्शन पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा नाओमी साटम, उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रपूर सुधाकर यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा दिपक साखरे, उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी दिनकर ठोसरे, महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर तसेच पोलीस निरीक्षक बल्लारशाह पोलीस स्टेशन आसिफराजा, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी चे पोलीस निरीक्षक अनिल जिटटावार, नागभिड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक विजय राठोड यांनी मोलाची कामगिरी बजावीत आता पर्यंत वरील सराईत गुन्हेगारांना चंद्रपूर जिल्हयातुन तडीपार करण्यात आले आहे.